"मटका जुगारला अभय कुणाचे " सर्यास होते दारू विक्री
" स्थानिक पोलीस प्रशासन गाढव झोपेत " प्रशासनावर संशयाचा विषय
खापा (घुडंन)
नरखेड तालुक्यात सर्यास रित्या अवैध धंदे चालताहेत या चालणाऱ्या अवैध धंद्याला नेमके अभय कुणाचे हा प्रश्न मात्र नेमका जनतेच्या मनात घर करून बसला आहे ,
तालुकयातील लहान मोठया गावात सर्यास देशी विदेशी दारू ची विक्री केली जाते यात बेलोना ,खरसोली ,भारसिंगी, लोहारी सावंगा ,घोगरा मेंढला वाढोना ,रामठी ,थडीपवनी ,खापा ,उमठा ,अश्या असंख्य गावांचा समावेश आहे ,येथे प्रत्येकी गावात अनेक प्रकारची देशी विदेशी दारू तर कुठे मटका ,जुगार तर कुठे बटटा सर्यास चालतो असे स्थानिक जनतेचे मत आहे ,
दारू विक्रीच नव्हे तर परिसरात अनेक गावांत वाटटा हा प्रकार मोठ्या जोमाने तोंड उचलत असल्याचे सांगण्यात येत आहे ,यात अंबाडा (सायवाडा ) या गावी जुगाराचे प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात असल्याचे सांगण्यात येत आहे तर येथे जुगारावर लागणार बटटा हे बाहेर गावा वरून येणारी काही जुगारी चालवितात असे देखील स्थानिकांचे म्हणणे आहे .
तालुक्याच्या अगदी शेवटाच्या टोकाला अंबाडा हे गाव आहे याचं गावाच्या अगदी 10 km च्या अंतरवून अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत आणि याचाच लाभ घेता तालुक्यातील काही बड्या गावातील जुगारी आपला जुगार अड्डा चालवीत असल्याचे बोलले जाते .
* रामठी आणि उमठयातून मोहफुलाच्या दारूचा महापूर *
जलालखेडा पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेले गावे रामठी आणि उमठा या दोन्ही गावातून मोहफुलाच्या दारूचा महापूर निघत असल्याचे जनतेकडून बोलले जाते उमठा या गावातील पारधी जमातिच्या एकूण एक घरी सर्यास खुल्या प्रमाणात मोह फुलांची दारू विक्रीच नव्हे तर या दोन्ही गावातून इतर गावांना देखील दारू साठा पुरविल्या जात असल्याचे सांगण्यात येते . पण येथील स्थानिक पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात कधी दिसत नाही का ? की काजळ भरून आहेत असे येथील जनतेचे मत आहे .
*लोहारी सावंगा अवैध धांदयला केंद्रबिंदू *
लोहरी सावंगा हे गाव देखील तलीक्याच्या सरते शेवटी असून जवडपास 4 हजार लोकसंख्येचे गाव आहे ,संपूर्ण गावात अंदाजे 10 ते 15 जण अवैध रित्या दारू विक्री करीत असल्याचे गावकाऱ्यांकडून बोलले जाते मुख्यतह याच गावात जलालखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी पोलीस चौकी देखील आहे तसेच विद्यालयीन क्षिक्षण ,बँक ,आरोग्य उपकेंद्र येथेच असल्याने परिसरातील किमान 20 ,25 गावे या गावाला जोडलेली आहेत आणि याचाच फायदा घेता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी येथे अवैध धंद्यात आपले हात येथे पसरलेले आहेत ,येथूनच लागून असलेले गावे खापा, घोगरा येथे देखील खुलेआम दारू विक्री केली जात असल्याचे बोलले जाते ,
खापा ते घोगरा या गावाच्या मध्ये जुनेवानी फाटा असून या फाट्यावर दारू विक्रीची दुय्यम सकाळी पासून नियमित बघायला मिळत असल्याचे सांगण्यात येते ,जुनेवानी येथील शाळकरी मूल मुली आपल्या गावातून 2 km अंतर पाइ चालून या फाट्यावर आपल्या शालेय वेळेस येतात पण नेमका याच वेळी दारू विक्रेत्यांचा या जागी धुमाकूळ असल्याचे शाळकरी विद्यार्था कडून सांगण्यात आले आहे . लोहारी सावंगा हे गाव जलालखेडा पोलिस हद्दीत येत असून येथे चालणारे अवैध धंदे हे कुणाच्या अभयाने चालतात हा प्रश्न नेमका स्थानिक जनतेला पडतो .प्रशासनाला या विषयी जाग नाही का ? की झोपेत असल्याचे सोंग करीत आहे , की यांनाच पाठबळ आहे असे प्रश्न येथील जनतेच्या मनात नेहमी पडत असतात .
अमरजित जांभूळकर, खापा (घुडंन)9021166144
9860848242