Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर १६, २०१९

१९ अनधिकृत बांधकामावर कारवाई




नागपूर, १६ नवंबर २०१९: नागपूर सुधार प्रन्यासच्या दक्षिण विभागातील खसरा क्रमांक ७३, शुक्ला नगर, हावरापेठ या अभिन्यासातील ९ मीटर रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण काढण्यात येत आहे. आज शुक्रवार, दिनांक १६ नवंबर २०१९ रोजी जेसीबी व टिप्परच्या अतिक्रमण हटविण्यात आले. सलग २ दिवस चालणाऱ्या या कारवाईत नासुप्रतर्फे तब्बल १९ अनधिकृत बांधकाम काढण्यात येत असून शुक्रवार रात्री उशिरा पर्यंत कारवाई चालणार आहे. 

नासुप्रच्या रिट पिटिशन १८५८/२०१८ या न्यायालयीन प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये नासुप्रचे सभापती यांच्या निर्देशाप्रमाणे व मुख्य अभियंता (मुख्यालय) यांच्या नेतृत्वात सदर कारवाई करण्यात येत आहे. कारवाई दरम्यान नासुप्रच्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता श्री. एस एन चिमुरकर, विभागीय अधिकारी (दक्षिण) श्री. अनिल राठोड, सहायक अभियंता श्रेणी-२ श्री. संदीप राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्री. रवी रामटेके व नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री. वसंत कन्हेरे तसेच अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.