नागपुरात नुकतेच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) चाकांचे मेंटेनंस करण्यासाठी पिट व्हील लेथ हे आधुनिक मशीन मिहान डेपो येथे स्थापित करण्यात आली आहे. अत्याधुनिक पद्धतीने ऑपरेटरच्या साहाय्याने ही मशीन हाताळली जाते. अत्यंत कमी वेळेत स्वयंचलितरित्या चाकांच्या मेंटेनंसचे कार्य करणारी ही मशीन जर्मनीहून आयात करण्यात आली आहे.
पिट व्हील लेथ मशीनचा वापर आणि देखभाल सहजरित्या करण्यासारखे आहे. या मशीनची पोझिशनिंग, मशीनिंग आणि मोजमाप प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने होते. मशीनची रचना व्हील सेट मशीनिंग तंत्रज्ञानाची उच्च पातळी दर्शवते. अचूकपणे मेंटेनंस करण्यासाठी पिट व्हील लेथ मशीन हाताळण्यासाठी फार कमी खर्च लागतो.
वर्धा मार्गावर सीबीटीसी प्रणालीने मेट्रोचे संचालन होत आहे. प्रकल्पाअंतर्गत प्रवासी सेवेत नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी सेवेशी संबंधित सर्व मशीन तयार किंवा आयात करून नियमितरित्या ट्रेन, ट्रॅक, केबलिंग व संबंधित सर्व उपकरणांचे मेंटेनंस केले जाते.