निवेदन देऊनही दखल घेत नसल्याने नागरिकांचा वाढला तीव्र संताप
येवला (विजय खैरनार) :
तालुक्यातील गारखेडा येथील गणेशवाडीच्या पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचाच आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. निवेदन देऊनही ग्रामपंचायत दखल घेत नसल्याने येथील ग्रामस्थ दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत.
येथून जवळ च खाजगी मालकीचा एक हजार कुक्कूटपालनाचा व्यवसाय होता. त्याजवळ दोनशे फुटावरच वाड़या वस्त्यांना असल्याने येथील मालकाने अजून एक दहा हजार कोंबड्यांचे कुकुट पालन पोल्ट्री फॉर्म बांधले येथील ग्रामस्थांचा यास तीव्र विरोध असून देखील येथील ग्रामपंचायत ला वारंवार तक्रार करून देखील कुणीच येथील नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यात पुढे येत नाही ग्रामपंचायती नेही परिसरातील ग्रामस्थांचा हरकत असूनही परवानगी देण्यात आली याकरिता तीन ग्रामसभा ही वर्षपासून घेण्यात आलेल्या तरी देखील कोणत्याच प्रकारच्या आरोग्य विषयी दक्षता घेत नाही ग्रामपंचायत ला वारंवार चार तक्रारी अर्ज करून ही उड़वाउड़वीचे उत्तर येथील ग्रामस्थांना मिळत आहेत.
गणेशवाडी परिसरात लोकसंख्या साठ ते सत्तर व बारा ते पंधरा अशा वाड्या-वस्त्या कायमच्या रहिवाशी आहेत परिसरातील पोल्ट्री व्यवसायामुळे आम्हाला आमच्या राहत्या घरात तसेच स्वयंपाक घरात माशांचा त्रास होऊन तसेच जेवणात पडू लागल्याने अतिप्रमाणात त्रास होऊन जेवण करणे देखील अवघड बनले आहेत व पाणी व अन्न दूषित होऊन गंभीर आजारांना लहान मुले व वयवृद्ध माणसे यांना तोंड द्यावे लागत आहेत त्यात दुर्गंधीमुळे व घाणीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार परिसरात पसरत आहेत तसेच आजूबाजूच्या वस्तीत पक्षांचे कण, मांशा व चिल्टे यांची वाढ झालेले आहेत त्यामुळे येथील नागरिकांचे सदस्यांच आरोग्य धोक्यात आलेले आहेत वारंवार कळून सुद्धा यावर कोणी लक्ष घालत नाही नेमके पाणी मूर्तेय कुठ असा प्रश्न नागरिकांचा होऊ लागला आहे सदर गट नं १०७/३ मधील मालक भास्कर यादव खैरनार यांच्या पोल्ट्री फार्म मुळे परिसरातील नागरिक यांच्या आरोग्यास बाधा धोका निर्माण झाला आहेत ग्रामपंचायत ग्रामसभेनेही असे मान्य केले आहेत
वरिष्ठ अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी पंचायत समिती, तहसीलदार साहेब, प्रांत अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी साहेब, महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांना निवेदनाद्वारे दिले आहे ग्रामस्थांच्या आरोग्यास मोठा जास्त धोका निर्माण झाला तर व जीवीत हानी जर झाली तर याला शासन जबाबदार राहील का असा तीव्र संताप ग्रामस्थ व्यक्त होत आहेत. निवेदनावर दिलीप खैरनार, अण्णासाहेब खैरनार, कैलास खैरनार, नानासाहेब आहेर, कारभारी गायकवाड़, मधुकर गायकवाड़, बाळासाहेब खैरनार, गंगाधर चिंचवने, विजय खैरनार, संतोष गायकवाड, दत्तू चिंचवने यांच्या स्वाक्षरी आहेत.
"आमच्या लहान मुलांना येथील पोल्ट्री फार्म मुळे अतिशय गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहेत कायम ते आजारी पडत असतात व आमच्या अन्न पाण्यात कायम माश्या पडत असतात त्यामुळे जेवन करायची सुधा इच्या होत नाही वर्षापासून आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहेत तरी देखील कोणी लक्ष देत नाही".
- संतोष गायकवाड़ ,गणेशवाडी गारखेड़ा.
"आमच्या राहत्या घरात अन्न पाणी दूषित होऊन बाहेर उठणे बसणे देखील अवघड बनले आहेत अति प्रमाणात वास सहन करावा लागत आहेत तसेच जास्त प्रमाणात माश्या आसल्याने जेवन करने सुधा अवघड बनले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर लवकरा लवकर लक्ष घालून त्वरित पोल्ट्री फार्म बंद करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू".
- विजय खैरनार ,गणेशवाडी गारखेड़ा.
"एक वर्षों पासून अती प्रमाणात विष्ठाचा वासाचा सामना करवा लागत आहे त्यामुळे सतत डोके दुखने असे वेगवेगळे आजार कायम होत आहेत अन्न- पाण्यात माश्या कायम पडत असल्याने जेवन करने सुद्धा अवघड बनले आहे घरातील मुलाना बाहेर मोकळे हावेत बसने आरोग्यला त्रास दायक झाल आहेत".
- दिलीप खैरनार ,गणेशवाडी गारखेड़ा.