पोलिस कंट्रोलला आरोपीने फोन केल्यानंतर केला गुन्हा दाखल
चंद्रपूर/प्रतिनिधी
जिल्ह्यात दारू बंदी चा फायदा जर कोनाला झाला असेल तर अर्थातच तो मोठ्या प्रमाणांत पोलिसांचा झाला आहे.दररोज लाखो रुपयाची दारू पकडल्या जाते मात्र ती कमी दाखवून काही पोलिस कर्मचारीच पकडलेली दारू अवैध दारू व्यवसायीना विकत असल्याचा विषय चर्चील्या जात आहे.अशातच काही पोलिसवाले तर एका दारूच्या बंपरसाठी किंव्हा एका पव्व्यासाठी सुद्धा गुन्हे दाखल करतात तर काही पोलिसवाले दारू जप्त करून ती स्वतःच गटकतात असे अनेक प्रकार समोर येत आहे.
असेच एक प्रकरण वरोरा पोलिस स्टेशन अंतर्गत नंदोरी टोलनाक्यावर दिनांक ११ नोव्हेंबरला सकाळी ५,३० वाजता घडली असून वरोरा पोलिस स्टेशन मधे डीबी पथकात कार्यरत निखिल कौरासे व इतर दोन ते तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी उमेश देशमुख यांच्या चार चाकी गाडीतून रॉयल चैलेण्ज नावाच्या इंग्लिश दारूचा अर्धा बंपर पकडल्या नंतर तो स्वतःसाठी प्यायला ठेवला असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र उमेश देशमुख यांनी पोलीसानी आपल्यावर करवाई न करता अश्लील आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून अपमानित झाल्यामुळे पोलिस शिपाई कौरासे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस कंट्रोल रूम (१००) मधे तक्रार केल्यानंतर आता आपले विंग फुटून आपल्यावर करवाई होणार या भितीने सूडबुद्दीने तक्रारकर्त्या उमेश देशमुख यांचेवर तब्बल १२ तासानंतर गुन्हा नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस शिपाई निखिल कौरासे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे आपले विंग फुटताच आपल्या खाकी वर्दीचा दुरुपयोग करून सर्वसामान्य व्यक्तीवर पोलिस कसे छडयंत्र रचतात हे या घटनेवरून दिसून येते.
उमेश देशमुख हे पोहाणे ले आऊट बोर्डा येथील रहिवासी असून ते एक सामजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विरोधात आजपर्यंत कुठल्याही पोलिस स्टेशन मधे कोणत्याही प्रकारची पोलिस केस नाही, अशा सामजिक कार्यकर्त्यांनी एक अर्धा बंपर दारू बाळगणे हा गुन्हा जरी असला तरी तो त्यांनी कबूल सुद्धा केला होता, पण निखिल कौरासे हा वरोरा येथील स्थाईक असून त्याला त्याच्या मूळ गावी कार्यरत ठेवणे नियमबाह्य आहे, कारण त्यांचे वरोरा येथील अवैध धंदेवाईक यांच्यासोबत चांगले संबध असल्यामुळे एखादी पोलिस धाड जरी पडली तरी हा पोलिस शिपाई अगोदरच ती माहिती समन्धित अवैध व्यावसायिकांना पोहचवीतात त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला महत्वच उरत नाही त्यामुळे निखिल कौरासे यांची अनेकदा बदली झाली असतांना सुद्धा त्यांना वरोरा येथेच का ठेवन्यात येत आहे ? हे कोडे अजूनपर्यंत कुणालाच सोडवता आले नाही.खरं तर निखिल कौरासे आणि त्यांच्या इतर पोलिसांच्या मनात उमेश देशमुख प्रकरणी चोर लपला असल्याने व यांना वाटंमारी करण्याची सवय असल्याने यांनी अर्धा बंपर दारू स्वतःला पिण्यासाठी ठेवली होती हे आता शीद्ध होतं आहे. कारण
निखिल कौरासे हे त्याच दिवशी त्यांचे मित्र रूयारकर यांच्या अंत्यसंस्कार यात्रेत दारू पिऊन असल्याचे अनेकांनी परस्पर चर्चेतून समोर आले आहे. अर्थात पोलिसच दारूडे असेल तर सर्वसामान्य जनतेने दारू पिणे हा गुन्हा कसला ? हा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.कारण जे स्वतःच चोर असेल तर चोराला पकडण्यापेक्षा चोराला असे पोलिस कर्मचारी चोरी करण्यास मदतच करीत असेल आणि ही बाब आता वरील प्रकरणावरून शीद्ध सुद्धा होतं आहे.
सामजिक कार्यकर्ते उमेश देशमुख यांनी आपला गुन्हा कबूल केल्यानंतर सुद्धा त्यांना काल शनिवार पर्यंत पोलीसानी अटक न करता त्यांच्या मित्रांकडे निखिल कौरासे हा पोलिस शिपाई ' त्या उमेश देशमुखला मी आता कसा पीसीआर घेऊन झोडपून काढतो तेच त्यांनी बघाव, मी त्याला वरोरा येथे राहणे मुश्किल करून टाकीन' अशा प्रकारच्या धमक्या देवून ऐन शनिवारला उमेश देशमुख यांना अटक करण्याचे कारस्थान रचले होते मात्र उमेश देशमुख यांनी अगोदरच त्यांचे कारस्थान उलटे पाडून सरळ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले आणि तक्रार देवून निखिल कौरासे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सूडबुद्दिने करवाई केल्याबद्दल त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.त्यामुळे आता वरोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हे काय करवाई करतील याकडे वरोरावाशीयांचे लक्ष लागून आहे.