Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर १९, २०१९

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात मद्यधुंद अनियंत्रित वाहन चालकाने 5 जणांना चिरडले:दोघांचा मृत्यू,३ जखमी

आरोपी वाहनचालक अटकेत
चंद्रपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात एका नवशिक्या वाहन चालकाने रुग्णालय परिसरात उभे असलेल्या रुग्णाच्या ५ नातेवाईकांना चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास रुग्णालयाच्या आतल्या परिसरात घडली.

चंद्रपूर शहरात गोपालपुरी इथं एका महिलेनं आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास तिचा मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला गेला.हा मृतदेह इको MH.३४.BF.५८१५ क्रमांकाच्या खाजगी वाहनाने रुग्णालयात आणला गेला,या गाडीचा चालक नवशिक्या होता, तसेच तो मद्यप्राशन करून होता असा आरोप केला जातं आहे.सकाळची वेळ असल्याने रुग्णाचे नातेवाईक प्रातविधी उरकण्यासाठी व ब्रश करण्यासाठी परिसरात उभे असतांना मृतदेह घेऊन आलेल्या या वाहन चालकाने परिसरात उभे असलेल्या ५ जणांवर गाडी चढविली,

                              यात मुमताज बेगम ह्जमतुल्ला शेख ५७ वर्षे व सुधीर गराडे (गडचिरोली)यांचा जागीच मृत्यू झाला,तर मीराबाई उपरे वय ४५ वर्षे रा. राजुरा ,राजेंद्र कामडे ३१ वर्षे रा. डोंगरगाव सिंदेवाही,शकीला पठाण वय ३५ वर्षे रा. घुग्गुस हे जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत,तर चालक गणेश दिलीप बम्बोडे वय ३२ वर्षे रा. गोपालपुरी चंद्रपूर याला पोलिसांनी अटक केली आहे, उपस्थित नागरिकांनी चालक हा मद्यप्रश्न करून होता.

असा आरोप केला मात्र चंद्रपूर शहर पोलिसांकडून घेण्यात आलेल्या प्राथमिक माहितीवरून असा कोणताही प्रकाराचा उल्लेख झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे चालक जर दारू पिऊन होता तर दारू आली कुठून हा तपासाचा विषय असणार आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.