Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर २५, २०१९

सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे महावितरणचे आवाहन


नागपूर/प्रतिनिधी:
दिवाळीची लगबग सुरु झाली असून सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण आहे, ह्या दिवाळीचा आनंद अधिक व्दिगुणित करण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले असून, महावितरणने आपल्या समस्त वीज ग्राहकांना, कर्मचा-यंना आणि हितचिंतकांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळीत होत असलेली सजावट, रोषणाई आणि आतिषबाजी यामुळे दुर्दैवी घटना व्हायला एक कारणही पुरेसे आहे, अश्या घटनांनी आनंदाचे वातावरण दु:खात बदलायला वेळ लागत नसल्याने अश्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठि खबरदारी घ्यावी, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवाळीच्या दिवशी फ़टाक्याने लागलेल्या आग़ीच्या घटना दरवर्षीच हजारोच्या संख्येने होत असतात, यात केवळ आर्थीकच नव्हे तर जिवीत हानीही मोठ्या प्रमाणात होत असते. सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने, निष्काळजीपणा आणि उदासिनता यामुळे अश्या घटना होत असतात. आपल्या व आपल्या कुटुंबियांचा दिवाळीचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी महावितरणने काही खबरदारीचे उपाय सुचविले असून त्यावर अंमलबजावणी करण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. 

दिवाळी आणि दिवे यांचे एक अतूट नाते आहे, त्यामुळे दिव्यांनी घराची सजावट करतांना ती मोकळ्या जागेतच लावावीत. पडदे, बिछाना यापासून ते लांब असतील याची काळजी घ्यावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दुर आणि उंचीवर तसेच पंखे, वीजतारा यापासूनही ते दुर ठेवावेत. उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा, तुटलेल्या वीज तारा वापरु नये किंवा जोड देतांना योग्य दर्जाच्या इन्सुलेशन टेपने त्या सुरक्षित करुन घ्यावेत, तुटलेले सॉकेट्स वापरू नये, घरात कुणीही नसतांना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत. फ़टाके उडविल्यानंतर त्याचा होणारा कचरा वीज यंत्रणेजवळ फ़ेकू नका, त्या कच-याची योग्य विल्हेवाट लावा, असे आवाहन करतांना महावितरणने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

हे लक्षात असू द्या:-

1. फ़टाके उडवितांना मोकळ्या जागेतच उडवावित.

2. विज तारांच्याजवळ फ़टाके उडवू नये.

3. विजेच्या उपकरणांजवळ फ़टाके ठेवू नये.

4. विद्युत सॉकेट्सवर अधिक भार टाकू नये.

5. रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्याव्यात.

6. फ़टाक्यांचा कचरा वीज यंत्रणेजवळ फ़ेकू नका.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.