पहिल्याच दिवशी जोरगेवार एक्शनमध्ये, पोलिस विभागाला निर्देश
फेरीवाले शहरातील फुटपाथवर दुकाने लावून आपला उदनिर्वाह करत आहे. आता महापालीका प्रशासनासह पोलिस विभागाच्या वतीने त्यांना त्रास देण्याचे काम केल्या जात आहे. मात्र आता फेरीवाल्यांच्या मदतीला नवनिर्वाचीत आमदार किशोर जोरगेवार समोर आले असून पर्यायी व्यवस्था होई पर्यन्त फुटपाथ वरील एकाही दुकानाला हात लावू नका असा निर्देश त्यांनी पोलिस विभागाला दिला आहे.
चंद्रपूरात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी मिळेल ते काम करुन चंद्रपूरातील बेरोजगार वर्ग आपल्या परिवाराचा उदनिर्वाह करत आहे. यात रस्त्याकडेला फुटपाथवर दुकाने लावणा-यांची संख्या अधिक आहे. हजारो कुंटुब अश्याच व्यवसायातून आपल्या परिवाराचे पालण पोषण करीत आहे. मात्र आता महापालीका व पोलिस प्रशासणाची वक्रदृष्टी या फेरिवाल्यांवर पडली असून फुटपाथ वरिल दुकाने उधळून लावण्याचा प्रकार त्यांच्याकडून केल्या जात आहे.
दोन दिवसापूर्वी तुकूम येथील फेरिवाल्यांना रामनगर पोलिसांनी ठाण्यात बोलावून नोटीस बजावली होती. त्यामूळे एन दिवाळीत त्यांच्या व्यवसायावर संकट कोसळले होते. मात्र आज येथील फेरीवाल्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना शूभेच्छा देत असतांना दपक्या आवाजात आपली व्यथा मांडली यावेळी जोरगेवार यांनी जोरात बोला मी तूमचा सेवक आहे असे बोलत त्यांची व्यथा एकली.
त्यानंतर आमदार जोरगेवार यांनी तात्काळ पर्यायी व्यवस्था होई पर्यंत तुकूम येथील फुटपाथ वरील कोणत्याही फेरीवाल्याच्या दुकानाला हात लावू नका असा निर्देश पोलिस विभागाला दिला आहे. निवडणूक निकाल आल्या नंतरच्या पहिल्यास दिवशी गरिबांसाठी जोरगेवार यांनी तात्काळ घेतलेल्या एक्शनमुळे फेरीवाल्यांनी त्यांचे आभार मानले आहे.