चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार 117570 एवढी मते घेऊन विजयी झाले आहेत.
चंद्रपूर मतदारसंघातून प्रत्यक्ष 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. आज जाहीर केलेल्या निकालात भारतीय जनता पार्टीचे नानाजी शामकुळे यांना 44909 मते, बहुजन समाज पार्टीचे भिक्कु बुद्धशरण 1772 मते, इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचे महेश मेंढे यांना 14284, बहुजन वंचित आघाडी कडून अनिरुद्ध वनकर 15403, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे अमृता गोगुलवार 482,
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ज्योतीदास रामटेके 324, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे नामदेव गेडाम 3956, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे बबन रामटेके 884, अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना 117570, तथागत पेटकर 562, मंदिप गोरडवार 629, संदीप पेटकर यांना 294 मते तर नोटाला 1730 एवढी मते मिळाली.

गुरुवार ठरला ३ वारांचा विजयी दिवस
चंद्रपूर जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहे. या सहा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांवर "वारांनी राज्य केल. बल्लारपूर मतदारसंघातून राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजय मिळविला. ब्रह्मपुरीतून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, तर चंद्रपुरात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना विजय मिळाला.