ललित लांजेवार:
यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले किशोर जोरगेवार यांनी सोमवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.या प्रवेशामुळे जोरगेवार यांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.सोमवारी सोशल मीडियावर पक्ष प्रवेशाचे फोटो अपलोड करण्यात आले होते.
चंद्रपूरच्या राखीव जागेसाठी प्रवीण पडवेकर, किशोर जोरगेवार,बाळू खोबरागडे, महेश मेंढे, यांची नावे चर्चेत होती. भाजपमधून शिवसेनेत गेलेले आणि शिवसेनेला रामराम ठोकत स्वतंत्र वर्षभर काम केल्यानंतर जोरगेवार यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढण्याचा निर्धार केल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र जोरगेवार यांनी जरी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी देखील पक्षश्रेष्ठीने चंद्रपूरच्या जागेसाठी अजूनही जोरगेवार किंवा अन्य आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांची नावे समोर केलेली नाहीत.
जोरगेवार यांच्याकडे सर्वगुणसंपन्न असा साठा असल्याकारणाने व जनसंपर्क देखील तगडा असल्याकारणाने संपूर्ण निवडणुकीच्या व प्रचार यांचा विचार करून व कार्यकर्ते व जनतेचा विचार लक्षात घेऊन जोरगेवार यांना टिकीट मिळण्याचे चान्सेस वाढतांना दिसत आहे
जोरगेवार यांनी शिवसेनेच्या तिकिटावर चंद्रपूर विधानसभेची निवडणूक लढविली होती.
त्यांना ५० हजारांहून अधिक मते पडली होती. त्यावेळी बंडखोरी केल्याने त्यांना भाजपमधून कायमस्वरूपी निष्कासित करण्यात आले होते.
जोरगेवार यांच्या पक्षप्रवेश यानंतर कार्यकर्ते चांगलाच उत्साह बघायला मिळाला त्यामुळे चंद्रपूरची ही रंगत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच असणार आहे. नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षश्रेष्ठी जोरगेवार यांना तिकीट देते की नाही हे मात्र येणाऱ्या काही तासात समजणार आहे.