ललित लांजेवार/नागपूर:
भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या व नंतर स्वतंत्र होंत काँग्रेसवासी झालेल्या यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले किशोर जोरगेवार यांनी सोमवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.या प्रवेशामुळे जोरगेवार यांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याचे जवळपास निश्चित झाले होते.
मात्र फार्म भरायला 2 दिवस शिल्लक असतांना काँग्रेसची अजून पर्यंत चंद्रपूरची जागा वेटिंगवर ठेवण्यात आली असून जोरगेवार व त्यांच्या कार्यकर्ते व चंद्रपूर काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील दशकापासून जोरगेवार आमदार बनण्याचे स्वप्न बघत आहेत.यासाठी जोरगेवार पाहिजे ते करायला तयार आहेत,भाजपमध्ये असतांन पासून जोरगेवार आमदारकीचे स्वप्न बघत असून प्रत्येक वेळेस त्यांचे स्वप्नही भंगले.
यंदाही काँग्रेसमध्ये त्याच उमेदीने पक्षप्रवेश केला मात्र काही स्थानिक नेत्यांच्या त्यांना विरोध झाला. जोरगेवार यांचा चंद्रपूर शहरात जनसंपर्क चांगला असून ते चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन आंदोलन करीत असतात प्रत्येक कार्यात गेल्या दहा वर्षापासून जोरगेवार हे सक्रिय दिसत असताना त्यांच्यामागे युवकांची फौज मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे.
विद्यमान आमदारांना पासून चंद्रपूरकर नाराज असून जर शहरात भाजप विरुद्ध कोणाचा सामना जर होत असेल तर त्यात जोरगेवार यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.सध्या शहरातील स्थिती देखील त्याच प्रमाणे आहे.
मागील विधानसभा निवडणुकीनंतरसर्व पक्षाचे लोक आराम करत होते तेव्हा किशोर जोरगेवार हे एकमेव नेते सतत 5 वर्षापासून जनतेच्या सेवेत अविरत कार्यरत होते असे जोरगेवर यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत.
जोरगेवार यांच्या मतदारसंघात राहिलेला दांडगा जनसंपर्क कार्यक्रमाला उपस्थिती व समाजकार्य
त्यामुळे किशोर जोरगेवार चांगलेच चर्चेत आहेत.
जोरगेवार यांना काँग्रेसकडून तिकिट मिळेल व आपण त्यांना भरघोस मताने जिंकून देऊ असे कार्यकत्यांचे स्वप्न. परंतु त्यांना अद्याप काँग्रेस पक्षाची तिकीट जाहीर केली नसल्याने त्यांच्या प्रयत्नांना व पक्षप्रवेशाला घरघर लागल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीतदेखील खा. बाळू धानोरकर यांना देखील याच समस्येचा सामना करावा लागला होता.पक्ष प्रवेश केल्यानंतर देखील बाळू धानोरकर यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आलेले नव्हते.त्यावेळेस सुद्धा अशीच नाराजी जनतेमध्ये पसरली होती.
त्यानंतर त्यांना तिकीट मिळाली व त्यांनी इतिहास रचून केंद्रात गृह राज्यमंत्री असलेले हंसराज अहिर यांना पराभवाचा धक्का दिला व त्यांना तिकीट देण्याच्या निर्णयाने महाराष्ट्रात काँग्रेस ला एका जागेवर तरी विजय मिळवता आला.व लोकसभेत महाराष्ट्रातुन काँग्रेसची ख्याती कायम ठेवली.
चंद्रपूरच्या राखीव जागेसाठी प्रवीण पडवेकर, किशोर जोरगेवार,बाळू खोबरागडे, महेश मेंढे, यांची नावे चर्चेत होती. मात्र जोरगेवार यांनी जरी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी देखील पक्षश्रेष्ठीने चंद्रपूरच्या जागेसाठी अजूनही जोरगेवार किंवा अन्य आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांची नावे समोर केलेली नाहीत.
तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून बसल्यानंतर दिल्ली-मुंबई चंद्रपुर असा विमान प्रवास केल्यानंतर देखील जोरगेवार यांना तिकीट न मिळाल्यामुळे जोरगेवार यांची चिडचिड आणखीच वाढत चाललेली आहे .खासदार धानोरकर व आमदार वडेट्टीवार हे दोघेही जोरगेवार यांच्यासाठी आग्रही आहेत मात्र पक्षश्रेष्ठी यांची कान कोणीतरी फुकली असल्यामुळे जोरगेवार यांचे नाव घेण्यासाठी पक्ष विलंब करत आहे.
जोरगेवार यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्या कट्टर समर्थक असलेला अमोल शेंडे याने जोरगेवार यांना उमेदवारी न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. तर एनएसयूआय गटातील काही पदाधिकारी देखील जोरगेवार यांना पाठिंबा देत असल्याकारणाने जोरगेवार यांना उमेदवारी मिळाली नाही तर एनएसयूआय पदाधिकारी एकत्रितपणे राजीनामा देणार असल्याची धमकी देखील पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस वरिष्ठांना दिलेली आहे.
काँग्रेसमध्ये पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांना ही धमकी जरी दिली असेल तरी मात्र गुरुवारी संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे जागावाटप संदर्भातील संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.जर काँग्रेसने जोरगेवार यांना तिकीट दिलेली नाही तर मात्र अपक्ष लढणार असण्याचे स्पष्ट होत आहे.
त्यामुळे पक्षश्रेष्ठी हे जोरगेवार यांना लॉलीपॉप देऊन झुलवत आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण होऊ लागलेला आहे.