उमरेड तहसिलदार प्रमोद कदम यांनी केले आवाहन
उमरेड/प्रतिनिधी:
तालुक्यातील नागरिकांना आधारकार्ड काढण्यासाठी आता बाहेरगावी जावे लागणार नाही. दरम्यान, आधारकार्डची सुविधा उमरेड येथील तहसील कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. जनतेने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार प्रमोद कदम यांनी केले आहे.
उमरेड शहर आणि तालुक्यात आधारकार्ड काढण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे नागरिकांना बाहेरगावी जाऊन आधारकार्ड काढावे लागत होते. परिणामी वेळ आणि पैैसा वाया जात होता. यासंदर्भात उमरेडचे उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे व तहसिलदार प्रमोद कदम यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
या बैठकीत तालुक्यातील नागरिकांना मोठया प्रमाणात आधारकार्डची समस्या जाणवत असल्याचे तहसिलदार प्रमोद कदम यांनी बैठकीत समस्या मांडली. त्यानुसार संबंधित खात्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आधारकार्ड केंद्र तातडीने उमरेड तहसिल कार्यालय येथे प्रशासकीय इमारतीत सेतूकेंद्रामध्ये नागरिकांसाठी पूर्वा कम्प्यूटर कडुन आधारकार्ड केंद्र ता १जुलै पासून तहसिल कार्यालयात सुरू करण्यात आले .
त्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. त्यानुसार तहसिलच्या प्रशासकीय इमारतीत आधारकार्ड केंद्राचा शुभारंभ तहसिलदार प्रमोद कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार योगेश शिंदे , कपिल हाटकर , योगेश्वर डाहाके सेतू अधिकारी अनिल जनार्दन खोण्डे , मकरंद आनंदेव , गजानन कटरे , अजय वानखेडे , रोशन ठेवके ,आधारकार्डचे ऑपरेटर प्रणय चांगदेव , निशात ताजने , पूर्वा कम्प्यूटर चे निखिल आदी नागरिकांच्या उपस्थित आधारकार्ड केंद्र सुरू केले .