- शासनाचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
- जि. प. प्राथमिक शाळा रानवाडी येथील प्रकार
- इमारत पाडण्याचे परिपत्रक निघूनही अजून पर्यंत कार्यवाही नाही
- एकूण ३४ विद्यार्थी घेतायत शिक्षण
- शाळे लगतच्या मंदिरात भरतात वर्ग
अमरजीत जांभूळकर, नरखेड 9860848242
रानवाडी येथील जी. प. प्राथमिक शाळेची इमारत गेल्या काही वर्षांवासून मोडकळीस आलेली असून सुद्धा त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. रानवाडी येथील शाळेचे बांधकाम हे १९६२ या काळातील असून अजूनपर्यंत नवीन बांधकाम तिथे करण्यात आलेले नाही. या शाळेमध्ये ऐकून ३४ विद्यार्थी शिक्षण घेत असून प्रशासन त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे. या शाळेच्या इमारतीचे छत मोडकळीस आलेले आहे त्यामुळे या पावसामध्ये ते कधीही कोसळू शकते त्यामुळे प्रशासनाने या कडे लवकर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. छत मोडकळीस आल्यामुळे शाळा समितीच्या सभेमध्ये विद्यार्थ्यांना शाळे लगद च्या मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अजून किती काळ विद्यार्थ्यांना मंदिरातच शिक्षण घ्यावे लागणार आहे हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना समोर उभा आहे. रानवाडी येथील शाळेमध्ये ऐकून १ ते ४ वर्ग आहे त्यातले वर्ग १ व २ रा चे विद्यार्थी मंदिरात शिक्षण घेत आहे. वर्ग ३ व ४ थी चे विद्यार्थी शाळेतील चांगल्या स्थितीत असलेल्या खोल्यांमध्ये शिक्षण घेत आहे. २०१७ या वर्षां मध्ये शासनाने या इमारतीला पाडण्याचे आदेश काढले परंतु आज पर्यंत त्यावर कसलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. एकीकडे सरकार शिक्षणावर खूप पैसा खर्च होत असल्याचा दावा करतात आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना मंदिरामध्ये शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. याला हेच म्हणावं लागेल चोराच्या उलट्या बोंबा.
येथील शाळेची इमारत पुष्कळ जुनी असून ती मोडकळीस आली आहे. या बाबत निवेदन देण्यात आले परंतु आजून पर्यंत कसलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. नाइलाजास्त्तव शाळा समितीची सभा घेऊन विद्यार्थ्यांना बाजूच्या मंदिरात बसवण्याचा निर्णय सर्व मतांनी घेण्यात आला.
- पुरुषोत्तम बेहनीया, अध्यक्ष शाळा समिती
रानवाडी येथील जी. प. प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली असून ती पाडण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून येत्या ८ दिवसांमध्ये त्याला मंजुरी मिळेल. मंजुरी आल्यानंतर लगेच त्या इमारतीला पाडण्यात येईल व नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येईल
- दिनेश धवड
गट शिक्षणाधिकारी प. स. नरखेड.