घरफोडी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.शूभम निमगडे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
त्याने रेल्वेतून चक्क १७ मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे.यासोबत लंपास केलेल्या दागिन्यांनी पैकी २ लाख ६३ हजार ५०० रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिणे चंद्रपूर पोलिसांनी जप्त केले आहे
या प्रकरणात त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे, शूभम हा बाबूपेठ परिसरात असल्याची माहिती एलसीबीचे पथकाला मिळाली होती. यावेळी त्याने चौकशीत शास्त्रीनगरात घरफोडी केल्याची कबुली दिली.तसेच बल्लारपूर-सेवाग्राम या मार्गाने धावणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांचे मोबाईल चोरल्याचे सांगितले.
१७ मोबाईल, ३२ ग्रॅम सोने, १० ग्रॅम चांदीचे दागिणे असा एकूण दोन लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.