वाडी न.प. मध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक
जलप्रदूषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूंची उत्पत्ती होते असे जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण), उलटी, कावीळ, विविध प्रकारचे ताप, पटकी, मलेरिया, खोकला, सर्दी यांसारखे विकार होतात. डेंग्यू फैलावण्यास कारणीभूत ठरणाऱ्या डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास संबधित घरमालकावर तसेच बांधकामांच्या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकालाही दंड केला जावू शकतो . डेंगू आजारावर मात करण्यासाठी उपाययोजना व जनजागृती म्हणून प्रत्येक वार्डात ड्रायक्लोराईड लिक्विडची फवारणी करा असे निर्देश नवनियुक्त वाडीचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिले .
डेंग्युच्या नायनाटासाठी फवारणी करा अशा प्रकारची बातमी तरूण भारत मध्ये ३१ जुलै रोजी प्रकाशीत झाली होती . सध्या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये उदभवणाऱ्या निरनिराळ्या आजारावर मात करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाची विशेष आढावा बैठक शुक्रवार २ ऑगस्ट रोजी घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते . यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ .मोनिका चारमोडे,वैद्यकीय अधिकारी डॉ .सत्यवान वैद्य, आरोग्य पर्यवेक्षक अनंत बचंपल्लीवार व न.प.क्षेत्रातील सर्व आशा वर्कर यांच्या सह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते .नाल्यातील साचलेले पाणी वाहते करणे, उघड्या असणाऱ्या विहिरीवर हिरवी नेट बसविणे,आशा वर्कर कडून घरोघरी जाऊन डेंगू अळी सर्वेक्षण करणे,व्हेट पाईपला जाळी बसविनेे,आजाराविषयी दवंडी देऊन जनजागृती करणे ,भंगार दुकानातील उघड्यावर असणारे व अडगळीत असणाऱ्या साहित्य,खुले टायरआढळुन आल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.विशेष म्हणजे मागच्या वर्षी वाडी न.प.परिसरातील अनेक रुग्ण डेंगूच्याआजाराने ग्रस्त होऊन सहा रुग्ण दगावले होते.ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी सर्वांनाच खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले.