चंद्रपूर/प्रतिनिधी:
सिंदेवाही तालुक्यातील नवरगावचे दै. पुण्यनगरीचे प्रतिनिधी अमर बुध्दारपवार यांना जिल्हा स्तरावरील पाचव्यांदा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांना नुकतेच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्याकडून दर वर्षी ” ग्रामीण वार्ता " पुरस्कार देण्यात येतो. त्यात शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेलेला व जिल्हयाचा भूषण ठरणारा हुमन प्रकल्पावर ” हुमन प्रकल्प मोजतोय शेवटची घटका ” या प्रकल्पाचा वृत्त मालिकेतून लेखाजोखा मांडून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. या बातमी करीता त्यांची पुरस्काराकरिता त्यांची निवड करण्यात आली.
पत्रकार अमर बुध्दारपवार यांनी विविध विषयावरील लिखान करून अन्यायाला वाचा फोडण्याचे कामासह गोर - गरिबांची व्यथा मांडून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर विशेष निर्भिडपणे लिखान केले आहे. त्यांना ग्रामिण विकास वार्ता पुरस्कारासह निर्भिड पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सन 2012, सन 2013 ,सन 2014 ,सन 2015 सतत चार वर्ष जिल्हास्तरावरील पुरस्कार प्राप्त केल्यानंतर पाचव्यांदा श्रमिक पत्रकार संघाच्या आयोजित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत दिल्लीचे राजकीय विश्लेशक तथा जेष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांचे हस्ते ग्रामीण वार्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, बहुसंख्य पत्रकार तथा जिल्हयातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
अमर बुध्दारपवार यांना पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल पत्रकार संघासोबत सामाजिक संघटनांनी , आप्तेष्ठ तथा मित्रपरिवारांनी बुध्दारपवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.