Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ०२, २०१९

२०० युनिटच्या अधिकारासाठी जोरगेवार भरपावसात निघाले रॅली घेवून

 दिव्यांक बांधवासह अनेक संघटना सहभागी
Image may contain: 1 person, on stage
चंद्रपूर/प्रतिनिधी:
आपण विज निर्माते आहोत, महाराष्ट्राच्या गरजेपेक्षा 30 टक्के विज आपण निर्माण करतो याचे मोठे दुष्परिणामही आपण भोगत आहो, त्यामूळे 200 युनिट हा आपला अधिकार आहे, तो मिळविण्यासाठी आपली विज आपला अधिकार हा नारा बुलंद करत लोकचळवळीतून आपला हक्क मिळवू अशी घोषणा यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष, किशोर जोरगेवार यांनी केले. चंद्रपूरकरांना 200 युनिट विज मोफत दया या मागणी करीता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने 1ऑगस्ट पासून स्वाक्षरी अभियान सूरु करण्यात आले आहे. आज निघालेल्या भव्य जनजागृती रॅलीने या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या रॅलीला संबोधित करतांना ते बोलत होते. 

यावेळी, नगर सेवक विशाल निंबाळकर, माजी नगर सेवक बलराम दोदानी, दिपक दापके, अजय जायस्वाल वंदना हातगावकर, साहिली येरने, कल्पना शिंदे, राजू जोशी शाहीन शेख, अनवर अली, आदिंची उपस्थिती होती.
Image may contain: 8 people, people smiling, people standing and outdoor
यावेळी पूढे बोलतांना किशोर जोरगेवार म्हणाले की , ऑगस्ट हा क्रांतीचा महिना आहे. या महिन्यात देशात अनेक क्रांतीकारी घटना घडल्या आहते. त्यामूळे आपली मोहिम ही आपण क्रांतीच्या महिन्यात सूरु केली आहे.200 युनिट विज मोफत दयावी ही एक मागणी नसून हा आमचा अधिकार आहे. आपल्या सर्वांना या मोहिमेत सहभागी होउन 200 युनिटची नव क्रांती घडवायची आहे. भर पावसात जनजागृती रॅलीसाठी उसळलेला जनसागर हा चंद्रपूरच्या इतिहासातील अभूतपूर्व क्षण आहे. 

आजच्या या जनसागराने 200 युनिटच्या क्रांतीचा भक्कम पाया रचला आहे. आपली लढाई मोठी असून ही ताकद अशीच शेवट पर्यंत कायम ठेवा असे आवाहण जोरगेवार यांनी केले. आपल्याकडे जमीन, पाणी, कोळसा मुबलक प्रमाणात असल्याने चंद्रपूरात विज प्रकल्प उभारण्यात आलेत. चंद्रपूरकर पाणी कपात सहन करुन या प्रकल्पांना पुरेसे पाणी देत आहे. प्रकल्प चालविण्यासाठी लाखो टन कोळसा देत आहे. या मोबदल्यात चंद्रपूकरांना प्रदूषण दिल्या जात आहे. येथे दररोज लाखो टन कोळसा जाळल्या जात असल्याने चंद्रपूरातील उष्णतेत वाढ झाली आहे. 

प्रदूषणात आपला जिल्हा राज्यात पहिला क्रमांकावर आहें. तर उष्णतेत आपण जगात अव्वल स्थानी आहे. याचा प्रचंड त्रास चंद्रपूकरांना सहन करावा लागत आहे. प्रदुषणामूळे त्वच्या रोग, अस्थमा, क्यान्सर यासारख्या विविध आजरांची लागण चंद्रपूकरांना होत आहे. उष्माघाताने मरणा-यांची संख्याही दरवर्षी वाढत आहे. एवढी अधिक किंमत चंद्रपूरकर सोसत आहे. त्यामूळे आता आपल्या हक्कासाठी आपल्याला संघर्ष करावा लगणार आहे.
Image may contain: 8 people, crowd and outdoor
 याची सूरुवात आज पासून झाली असून आपण 200 युनिट विज मोफत दया या मागणी करिता एक लाख स्वाक्ष-यांचे पत्र मुख्यमंत्री यांना पाठवणार आहोत. यात आपला सहभाग मोठया संख्येने दिसून आला पाहिजे असे आवाहण यावेळी बोलतांना किशोर जोरगेवार यांनी केली.

घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी, 200 युनिट वरिल विज ही प्रति युनिट उत्पादन खर्चात म्हणजेच 2 रुपये 50 पैसे इतक्या दरात देण्यात यावी, शेतकरी बांधवांना विज मोफत देण्यात यावी, उदयोग वाढीसाठी उदयोगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी, या मागण्यांकरीता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतीचा महिना असलेल्या 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत स्वाक्षरी मोहिम चालविण्यात येणार आहे.

 या मोहिमेचा आज 1ऑगस्ट ला गांधी चौकातून निघालेल्या जनजागृती रॅलीने शुभारंभ झाला. गांधी चौकातील माहात्मा गांधी यांच्या पुतळयाला मार्ल्यापन करत या रॅलीला सूरुवात झाली. या रॅलीत विविध सामाजीक संघटना, दिव्यांग बांधव, सामाजीक कार्यकर्ते, क्रिडा मंडळ, व्यायमशाळा, आशा वर्कर भजन मंडळ यांच्यासह हजारोच्या संखेने नागरिकांनी सहभाग घेतला. भर पावसात गांधी चोकातून निघालेली ही रॅली शहराच्या मूख्य मार्गाने होत जटपूरा गेटला वळसा घालून पून्हा गांधी चौकात पोहचली व येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. 

यावेळी या रॅलीत सहभागी झालेल्या भजन मंडळ, दिव्यांग बांधव, ढोल ताशा पथक, बॅंन्ड पथक आदिंचा किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यंग चांदा ब्रिगेडचा वतीने सुरु करण्यात आलेली ही स्वाक्षरी मोहिम 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत चालणार असून यात एक लाख स्वाक्षरी पत्र मुख्यमंत्री यांना पाठवीण्यात येणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.