Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ०२, २०१९

स्थानिक स्तरावर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुख्याध्यापकांचा:डॉ.कुणाल खेमनार

संबंधित इमेजचंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेता कोणत्याही वेळी पुलावरून पाणी वाहून जाण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी नाला ओलांडून शाळेत जावे लागते. अशा ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे गावाजवळच्या नाल्यांना किंवा नदीला पूर आला असेल तर अशा परिस्थितीत शाळा सुरू ठेवायची अथवा बंद ठेवायची याबाबतचा निर्णय मुख्याध्यापकांनी स्थानिक स्तरावर घ्यावा. याबाबत सर्व तहसीलदारांना निर्देश दिले असून आवश्यक असणाऱ्या ठिकाणी नागरिकांच्या संपर्कात राहण्याची सुचवण्यात आले आहे. नागरिकांनी देखील आपल्या भागात अतिवृष्टीची परिस्थिती असल्यास तात्काळ तालुका नियंत्रण कक्षाची संपर्क साधावा. आपल्या घराचे बांधकाम शक्यतो भूकंपरोधक शास्त्रोक्त पद्धतीनेच करावे. तहसील कार्यालयातून आपल्या गावांसाठी निश्चित करण्यात आलेल्या जवळच्या सुरक्षित स्थलांतर करण्यासाठीच्या ठिकाणाची माहिती करून घ्यावी. 

पुरादरम्यान उकळलेले अथवा क्लोरीनद्वारे शुद्ध केलेले पाणी प्यावे. खाण्याचे पदार्थ झाकून ठेवावे. जास्त आहार घेऊ नये किंवा हलका आहार घ्यावा. पूरपरिस्थिती मध्ये बैलगाडी, कृषी उपयोगी मशीन, पाळीव प्राणी इत्यादीना सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे. आपत्कालीन बॉक्स नेहमी आपल्या जवळ बाळगावा. तसेच बॅटरी कोरड्या स्वरूपातील अन्नपदार्थ, मेणबत्ती, माचिस इत्यादी आवश्यक वस्तूंचा समावेश असावा. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर स्थलांतर करण्याच्या सूचना मिळाल्यास सर्वात पहिले थंडीपासून बचाव करणारे कपडे, औषधी, मौल्यवान वस्तू, वैयक्तिक महत्त्वाची कागदपत्रे इत्यादी वॉटरप्रूफ पिशवीमध्ये भरून सुरक्षित ठेवावे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्य करणाऱ्या पथकाला संपूर्ण सहकार्य करावे.

तसेच नदी दुथडी भरून वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, लहान मुलांना पुराच्या पाण्याजवळ जाऊ देऊ नये. पाणी वाहत असल्यास वाहनाद्वारे अथवा कोणत्याही पद्धतीने पूल पार करण्याचा प्रयत्न करू नये.

 घरात पाणी घुसलेची परिस्थिती निर्माण झाल्यास सर्वप्रथम विजेचे सर्व कनेक्शन बंद करावे. पुरामुळे प्रभावित झालेल्या विद्युत उपकरणांचा वापर करण्यापूर्वी त्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्याचा उपयोग करू नये. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.