विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी घेतली दखल
८८ स्कूल बसवर केली कारवाई
नागपूर / अरूण कराळे:
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुक व्हावी यासाठी एमआयडीसी वाहतूक पोलिसांतर्फे वाडी,एमआयडीसी,हिंगणा परीसरात शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी झोन डीसीपी चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी विभाग पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक विनोद गिरी,पोलीस उपनिरीक्षक किशोर गवई,विनोद सिंग,देवकूमार मिश्रा,जयशंकर पांडे,संजयसिंग बैस,अरविंद नाईक,अनिल वलेक, राजेश बांबोले,राजेश कोडापे,शेखर वरखडे,मिलींद कोल्हे,रविंन्द्र धुलसे,संतोश कोरडे ,सूरेश टेलेवार, अनिता चव्हान,अनिता डोयफोडे,जयश्री कडू यांनी सुरक्षा मोहीम राबवून ८८ स्कूल बसवर कारवाई केली .कारवाही दरम्यान पोलीसांनी वेग वेगळी टीम तयार केली होती .
परमीट नसलेले वाहन १७ ,चालकांनी गणवेश घातले नसेलेले २७,ओव्हरसीट ३ , बिल्ला नसलेले ९ ,नंबर प्लेट नसेलेले १५ ,सीट बेल्ट न लावलेला १ अशा प्रकारचे एकूण ८८ स्कूल बस,व्हेन व ऑटो रिक्शा व चालकांवर कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान परिसरातील शाळेला भेट देवून पालकांना व विद्यार्थ्याना स्वःसुरक्षा बद्दल सतर्क करण्यात आले.तसेच शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबद्दल वाहतूक पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी चर्चा केली .