नवी दिल्ली- श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात केले दाखल करण्यात आले.
प्रकृती स्थिर असल्याचे ङाॅक्टरांनी सांगितले.
सध्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या जेटलींच्या तब्येतीवर डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेवून आहे. दरम्यान, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन दीक्षित यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते. अरुण जेटली यांच्या डाव्या पायाला सॉफ्ट टिशू कॅन्सर आहे. यावर उपचारसाठी जानेवारी महिन्यात ते अमेरिकेलाही गेले होते. तसंच गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्रक्रियाही पार पडली होती.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्रीपद भूषवल्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र त्यांनी आपला मंत्रिमंडळात समावेश न करण्याची विनंती केली.