चंद्रपूर/प्रतिनिधी:
भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्य १५ ऑगस्ट, २०१९ रोजी सकाळी ०७.४० वाजता मनपा महापौर सौ. अंजलीताई घोटेकर यांचे शुभहस्ते सर्वप्रथम गांधी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून उपमहापौर श्री अनिल फुलझेले, आयुक्त श्री संजय काकडे, स्थायी समिती सभापती श्री राहुल पावडे, सभागृह नेता श्री वसंत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत "ध्वजारोहण" कार्यक्रम शालेय बैंडच्या सुमधुर संगीतात उत्साहाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बोलतांना महापौर सौ. अंजली घोटेकर म्हणाल्या की, राष्ट्रध्वजाच्या रंगांमध्ये अशी काही प्रेरणादायी शक्ती आहे, जी आपल्या क्षमतेच्या पुढे जाऊन कामगिरी करण्यास आपल्याला भाग पाडते. योग्य प्रमाणात असलेले हे रंग म्हणजे संतुलनाचे प्रतीक आहे. तरुणांच्या उर्जेचे, उत्साहाचे स्वरूप आणि व्यवस्थापन यांचे योग्य संतुलन साधल्यास देशाच्या विकासात कशाचाच अडथळा राहणार नाही आणि भारताचा तिरंगा मानाने जगाच्या नकाशावर विराजमान होईल.आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी अतिशय महत्वाचा व अभिमानाचा आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राखणे आपले कर्तव्य आहे.
याप्रसंगी रफी अहमद किदवई शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय बँडद्वारे राष्ट्रगीत सादर केले. ध्वजारोहणास उपमहापौर श्री अनिल फुलझेले, सभापती श्री. राहुल पावडे, उपायुक्त श्री. गजानन बोकडे, सहायक आयुक्त श्री. धनंजय सरनाईक, शीतल वाकडे. श्री. सचिन पाटील, शहर अभियंता श्री. महेश बारई, श्री. मनोज गोस्वामी, श्री.विजय बोरीकर, श्री.अनिल घुमडे, श्री. हजारे, श्री. अनिल घुले, सर्व नगरसेवक - नगरसेविका, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.