ललित लांजेवार/नागपूर:
चंद्रपूर जिल्ह्यात मागील ३ दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. तर जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. अश्यातच चंद्रपूर-दाताळा मार्गावरील ईरई नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गाने जाणारया तब्बल ८ गावांचा संपर्क तुटला आहे व हा मार्ग रहदारीसाठी बंद झाला आहे.

सध्या या मार्गावरील नवीन पूल बांधकाम सुरु आहे,मात्र दाताळा हे गाव चंद्रपूर शहराला लागले असल्याने रामनगर मार्गे रहदारी सुरु असते अश्यातच पावसाचे पाणी जास्त झाले कि हा मार्ग बंद होतो त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या ७ ते ८ गावांचा संपर्क तुटला आहे.तर शहराच्या पठाणपुरा गेट कडून मार्डा मार्गे येणाऱ्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हा मार्ग बंद आल्याने नागरिक लांबच्या मार्गाने शहरात येत आहेत.