Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून १०, २०१९

धक्कादायक:नागपुरात KG1च्या मुलीवर लैंगिक अत्याचार

इंग्रजी शाळेतील घटना 
स्कूल ऑफ स्कॉलर शाळा
 नागपूर /अरुण कराळे :
वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील नाका नंबर १० काचीमेट कोठारी लेआऊट येथील रविवार ९ जून रोजी स्कूल ऑफ स्कॉलर ( इंग्रजी माध्यम )शाळेच्या आवारातील खोली मध्ये राहणाऱ्या चपरासी महिलेच्या भावाने ४ वर्षाच्या मूलीवर लैंगिक अत्याचार केल्याने संपूर्ण वाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्राच्या माहितीनूसार फिर्यादी आई,वडिल आपल्या मुलीसह फुटाळा वस्ती नागपूर येथे राहत असून लोकांच्या घरी धुणीभांडीचे काम करीत असायची. तिच्या कडे काचीमेट कोठारी लेआऊट येथील स्कूल ऑफ स्कॉलर शाळे जवळ धुणीभांडी चे काम असून ति रोज येथे काम करण्यासाठी येत होती.


 तिला एक ४ वर्षाची मुलगी असून ति केजी १ वर्गात शिकत आहे. मुलीला शाळेला सुट्टी असल्यामुळे आई तिला कामावर घेऊन यायची. मुलीचे वडील हातमजूरी चे काम करायचा.स्कूल ऑफ स्कॉलर शाळे च्या चपराशी म्हणून काम करणारी निकीता प्रशांत तांबे हिला शाळेने तिथेच एक वेगळी राहायची शाळेच्या आवारातील एक रूम दिलेली आहे.


सोबत आरोपी भूषण भिमराव दहाट वय २५ वर्ष असून हा त्याची बहीण निकिता सोबत राहायचा. तो कुठेतरी प्रायव्हेट काम करित आहे. फिर्यादी आई सोबत निकीता चे घनिष्ठ संबंध होते. भूषण हा फिर्यादी आईसोबत आधी छान बोलायचा नंतर त्याने तिच्यावर वाईट नजरेने पाहण्याची सुरुवात केली होती. 

त्यामुळे ती त्याच्यासोबत बोलायची नव्हती. तिने त्याला यापूर्वी सुद्धा समजावले की तू माझ्यावर वाईट नजर टाकू नकोस, माझी मुलगी तुला मामा म्हणते.मागील तीन दिवसांपासून निकिता ही गावाला गेली होती.

फिर्यादी आई ही नेहमीप्रमाणे सकाळी पीडितीला घेऊन कामावर आली होती. मुलीला दुपारपर्यंत सोबत ठेवले नंतर तिला भूक लागल्याने व आईला अधिक काम असल्याने निकिता चा घरी स्कूल ऑफ स्कॉलर शाळा काचीमेत कोठारी लेआउट येथे दुपारी २ .३० वाजता मुलीला घेऊन गेले. तेव्हा तिथे फक्त निकिताचा भाऊ आरोपी भूषण हा उपस्थित होता. मुलीला भूक लागली असता आईने आणलेली मॅगी भूषणला  खाऊ घालायला सांगितले होते. तसेच आईला काम असल्यामुळे ती अर्धा तासासाठी बाहेर गेली होती. आईने मुलीला भूषणच्या भरवशावर सोडले होते. 

आई कामाला गेली असतात भूषणने तिला फोन केला व सांगितलं काम झाले काय? व मला बाहेर जायचे आहे. भूषण मुलीला परिसरातील रेसिडेन्सी बिल्डींग च्या पार्किंग मध्ये नेऊन दिले होते.पार्किंग मध्ये मुलगी बसली असताना आईला चुकीचे झाल्याचा संशय आदळले. तिने मुलीला विचारले असता मुलीने लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. वारंवार आईने आरोपी भूषण वर विचारपूस केली असता त्यांनी असे नाही केल्याचे सांगितले.

 रविवार  ९ जून रोजी हा प्रकरण घडले असून वाडी पोलिसांनी आरोपी भूषण भीमराव दहाट याविरुद्ध भारतीय दंड सहिता ३७६ ( २ ) ( जे ) ( आय ) नुसार गुन्हा दाखल केला.आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक  राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात आर.एस.संकपाळ करीत आहे.

सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.