आरोपी फरार
नागपूर/अरुण कराळे:
वाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून २० मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेला ट्रक थेट अकोल्यात सापडला . वाडी पोलिसांच्या कामगिरीबद्दल ट्रान्सपोर्ट व्यावसीकांनी आनंद व्यक्त केला .
वाडी पोलीस सुत्राच्या माहितीनुसार, अमरावती महामार्ग, नवनीतनगर जवळील इंडियन पेट्रोलपंपसमोर २० मे रोजी रात्री शरीफ मो. मन्सूरी ( वय ४० ), रा. पथरवा, जिल्हा रिवा, मध्यप्रदेश यांनी आपला टाटा २५१५ सी. ई .एक्स. कंपनीचा १० चाकी एम. पी. २० / एच. बी. १९९८ क्रमांकाचा ट्रक उभा केला होता. या ट्रकची किंमत अंदाजे ६ लाख रुपये आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चलाखीने हा ट्रक चोरून नेला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार वाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवी ३७९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता .
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक .अमोल लाकडे, पोलिस कर्मचारी अनिल गजभिये, महेंद्र सडमाके, जितेंद्र दुबे, दिलीप आडे यांनी सतत नियमित तपासात अमरावती महामार्गावरील सर्व टोल नाक्यावरील फुटेज तपासून अकोला शहरापर्यंत पोहचले. येथील औद्योगिक परिसरात हा ट्रक लावारीस स्थितीत पडला होता. पोलिसांना मात्र चोरटे सापडूू शकले नाही.
अंदाजे किंमत ६ लाख रुपये असणारा ट्रक वाडी पोलिसांनी पोलिस ठाण्यात ३ जून रोजी अकोल्यावरून आणून जमा करण्यात आला आहे. वाडी पोलीस चोरट्यांचा तपास करीत आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त विवेक मसाळ, सहाय्यक आयुक्त शिंदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यापूर्वीही चोरीला गेलेले ट्रक मिळविण्यात वाडी पोलिस किती यशस्वी होतात . याकडे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे.