६१ पिशव्या रक्तदान
तरुणाईची मानवता
नागपूर/प्रतिनिधी:
दैनंदिन जीवन जगत असताना आपण ज्या समूहामध्ये राहतो त्यांच्याप्रती आपले उत्तरदायित्व आहे या संकल्पनेतून कोराडी प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय रक्तदान दिनानिमित्त १४ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. थेलेसेमियाग्रस्त रूग्णांसाठी रक्तसंकलन करण्यात आले
कोराडी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी आय.एल.के. ८८,८९ तसेच व्हॅकेशन ट्रेनिंग ९८ ,९९ बॅचच्या एकूण ६१ रक्तदात्यांनी या निमित्ताने रक्तदान केले. डॉ.हेडगेवार रक्तपेढीने रक्तसंकलन केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व डोनर कार्ड देण्यात आले.
दुसऱ्या प्रति नि:स्वार्थ काम करण्याची भावना, सामाजिक जाणिवेतून पैश्या पलीकडचे समाधान व प्रेरक ऊर्जा मिळते. रक्तदान म्हणजे, मानवाने मानवासाठी केलेले हे सर्वश्रेष्ठ दान आहे. विशेष म्हणजे तरुणांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करून मानवतेचा परिचय दिला.
कोराडी वीज केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मुकेश गजभिये यांचे हस्ते फित कापून रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. कोराडी प्रशिक्षण केंद्राचे मुख्य अभियंता श्री.दिलीप धकाते यांच्या मार्गदर्शनामुळे हे शिबिर यशस्वी झाले.
हेडगेवार रक्तपेढीचे डॉ.अनसिंगकर व श्री. प्रवीण पाटील , कोराडी प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक अभियंता श्री.आनंद मेश्राम, कार्यकारी अभियंता सर्वश्री.विनय हरदास, मिलिंद रहाटगावकर, श्रीपाद पाठक, सौ. सारिका सोनटक्के, अतिरिक्त कार्यकारी अभियंता डॉ.किशोर सगणे, श्री.प्रवीण तीर्थगिरीकर,श्री.कुमुद चौधरी आदींनी रक्तदान शिबिराच्या यशस्वितेकरिता अथक परिश्रम घेतले.
*कोराडी प्रशिक्षण केंद्रातील १२ पैकी ४ अभियंत्यांनी व श्री.एन. पी.ठाकरे,व्यवस्थापक(मानव संसाधन) यांनी स्वत: रक्तदान करुन आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय करुन दिला.