Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २६, २०१९

बिलिंग असिस्टंटच्या भरतीबाबत व्हॉटस् ॲप किंवा इमेलवर विश्वास ठेवू नये महावितरणचे आवाहन

नागपूर/प्रतिनिधी:

महावितरणमध्ये बिलींग असिस्टंट या पदाकरिता कोणत्याही प्रकारची भरती सुरु नाही. तसेच बिलींग असिस्टंट असे पदच महावितरणमध्ये अस्तित्वात नसल्याने या पदाच्या भरतीसाठी जाहिरात देखील काढण्यात आलेली नाही.

परंतु बिलिंग असिस्टंट या पदाकरिता शुल्क भरून ट्रेनिंगसाठी व रूजू होण्याबाबतचा अनधिकृत मेसेज, इमेल किंवा व्हॉटस् ॲपद्वारे पाठविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. हा मेसेज किंवा इमेलद्वारे आलेला आदेश खोटा व अत्यंत दिशाभूल करणारा असल्याने त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये.

दिशाभूल करणाऱ्या या आदेशामध्ये १० जुलै ते १९ जुलै २०१९ असे पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २५ जुलै रोजी रूजू व्हावे आणि त्याकरिता बँकेत ३० हजार ९६० रूपयांचा भरणा करावा, असे नमूद करण्यात आले आहे. तथापि, महावितरणकडून प्रशिक्षण व रूजू होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही.. त्यामुळे अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या इमेल किंवा व्हॉटस् अॅपवरील मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. तसेच महावितरणतर्फे कोणत्याही पदाची भरती करतांना त्याची माहिती महा वितरणच्या www..mahadiscom.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येते, असेही महावितरण तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.