वाडीतील फुटपाथ केला रिकामा
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे :
येथील अमरावती महामार्ग लगत असलेल्या वाडी नाका नंबर १० ते आठवा मैल पर्यत असलेल्या रिकाम्या जागेवर दुकानदारांनी अतिक्रमण केले होते .
त्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी वाडी नगर परिषदनी वारंवार नोटीस बजावूनही अतिक्रमण न काढल्यामुळे नगर परिषद द्वारा बुधवार २६ जून रोजी महामार्ग लगत असलेले सर्व पानठेले ,नास्ता चहाचे दुकान, चिकन सेंटर , फळाचे दुकाने, होर्डिंग हटवून अतिक्रमणावर हातोडा चालविला .
जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण जमीन दोस्त केले .वाडी नगर परीषद तर्फे ६ महिन्यापूर्वीच दुकानदारांना नोटीस देवून अतिक्रमन कार्यवाही केली होती .यावेळी मुख्य अभियंता विलास बोरकर, उपमुख्याधिकारी आकाश सहारे, अभियंता आकांशा पाटील, नगररचना सूरज बाडेकर, मनोहर वानखेडे, संदीप अढाऊ, भारत ढोके, कपिल डाफे, धनंजय गोतमारे,शैलेश आरीवारेकर,कमलेश तिजारे,रमेश ईखनकर आदीच्या उपस्थितीत तसेच पोलीस उपनिरीक्षक देविदास चोपडे,डब्लू पोलीस उपनिरीक्षक आर संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक श्याम कावनपूरे,संजय गायकवाड आदीच्या बंदोबस्तात अतिक्रमण काढणे सुरू आहे .