सिंदेवाही नगरपंचायत चे दुर्लक्ष
जनतेला नाहक त्रास
(प्रशांत गेडाम/सिंदेवाही):
सिंदेवाही नगर पंचायत हद्दीतील मुख्य बाजारपेठ तथा नगर पंचायत कार्यालय सिंदेवाही येथे पार्कीग ची व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची समस्या दिवसेनदीवस वाढत आहे. नगरपंचायत हद्दीतील गाळे मोठ्या प्रमाणात असून त्या गाळेधारकांच्या दुकानाचे समोर ग्राहकांसाठी टू व्हीलर फोर व्हीलर चे कोणतीही पार्किंगची व्यवस्था नाही.
आजतागत नगरपंचायतीने करून न दिल्यामुळे दुचाकी वाहन तसेच चार चाकी वाहन व पादचारी यांना खूप त्रास सहन करावा लागते. नगरपंचायत हद्दीत असलेले गाळे दुकान्याचा बाहेर त्या-त्या दुकानदाराचा अतिक्रमण असल्यामुळे कोणतेही गाडी वाहन ठेवण्यासाठी जागा उरलेले नाही .
जर एखाद्या नागरिकांनी आपल्या दुचाकी वाहन ठेवल्यास गाळे दुकानदार व नागरिक मध्ये माझ्या दूकानासमोर का ? लावली म्हणून भांडण होतात.तसेच गुजरी बाजार मुख्य मार्केट मध्ये भरत असल्यामुळे पायदळ चालणाऱ्या लोकांना सुद्धा या समस्येच्या समोर जावे लागत आहे. त्यामुळे नगरपंचायत या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून मार्केटमध्ये येणार्या ग्राहकांसाठी, नगरपंचायत कार्यालयासाठी , नगरपंचायतचे गाळे धारकांसाठी पार्किंगची व्यवस्था लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे . अशी मागणी वृत्तपत्रद्यारे शिवसेनेचे मिथुन मेश्राम व नागरिकांकडुन होत आहे.