अध्यक्षपदी अशोक येरमे तर सचिव गंगाधर कुनघाडकर
मूल/रमेश महुरपवार:
मूल तालुका पत्रकार संघाची व्दिवार्षीेक नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी नवभारतचे अशोक येरमे तर सचिवपदी लोकमत ग्रामिणचे गंगाधर कुनघाडकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष साप्ताहिक सर्वदेशबांधवचे संपादक रविन्द्र बोकारे आणि सहसचिव तरूण भारतचे युवराज चावरे यांची निवड करण्यात आली.
मूल तालुका पत्रकार संघाच्या सभाग्रुहात आज.2 ला झालेल्या सर्वसाधारण सभेत पत्रकार संघाची पुढील व्दिवार्षीक कार्यकारणी गठीत करण्याच्या विषय पत्रकार संघाचे निवर्तमान सचिव विनायक रेकलवार यांनी ठेवला. पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे यांनी नविन कार्यकारणीच्या पदाधिका—यांचे नावांच्या प्रस्ताव मांडला. सभेला उपस्थीत सर्व सदस्यांनी एकमताने सदर प्रस्ताव स्विकारत पडोळे यांना अनुमोदन दिले. तत्पुर्वी मूल तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ पडोळे आणि पत्रकार संघाचे नवनिर्वाचित सहसचिव युवराज चावरे यांच्या मातोर्षी सुलोचना चावरे यांच्या निधनाबददल शोक व्यक्त करून त्यांना पत्रकार संघाचे वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आले. तसेच पत्रकार संघाचे सदस्य नुरूल हक अंसारी यांच्या मुलगा ज.ईम यांनी बारावी विज्ञान शाखेतुन जिल्हयात तिसरा क्रमांक पटकाविल्या बददल अंसारी यांचे पत्रकार संघाचे वतीने अभिनंदन करण्यात आले.
नविन कार्यकारणीत निवड झालेल्या सर्व पदाधिका—यांना पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन करण्यात आले. यासभेला पत्रकार संघाचे सदस्य राजु गेडाम, भोजराज गोवर्धन गुरूदास गुरनूले,प्राध्यापक चंद्रकात मनीयार,दीपक देशपांडे,वासुदेव आगडे,विजय पाकमोडे उपस्थीत होते.