धामणा परिसरात वाघाने केला प्राणघातक हल्ला
परिसरात हीस्त्र पशुच्या हल्यात दोन नागरिकांसह एक बैल जखमी
महीन्यातील तीसरी घटना
वनअधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना दिला सावधानतेचा इशारा
नागपूर / अरूण कराळे :
नागपूर तालुक्यातील धामना जवळील शिरजोरी बुवा शिवारात शनिवार २२ जुन रोजी दुपारी चार वाजता च्या सुमारास वाघाने गाईवर हल्ला केल्याने गाईला ठार मारले तर गोऱ्हयाला जखमी केल्याची घटना घडली आहे शिरपूर येथील रमेश तुमडे हा नेहमी प्रमाणे जंगलात गाई चारण्याकरीता गेला असता चार वाजताच्या सुमारास वाघाने अचानक गाईवर हल्ला केला व गोऱ्हयाला जखमी केले असुन शेतकऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे ह्या भागात वांगी, चवळीच्या शेंगा व हिरवा भाजीपाला ची लागवड केली असुन शेतकरी शेतामध्ये जागली जात आहे पण आता भितीचे वातावरण असल्याने वनविभाग यावर कोणते उपाययोजना करेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे .
शनिवार २२ जुन रोजी पहाटे तीनच्या सुमारास वाघाने धामणा (लींगा) येथील शेतकरी सुधाकर भदुजी क्षिरसागर यांच्या शिरपूर शिवारात असलेल्या आमराईत धापेवाडा त.कळमेश्वर जि.नागपूर येथील रहिवासी केशव शामराव पारसे वय ६२ यांनी आंब्याचे फळ खरेदी केले व परिसरातील नागरिकांनी आंबे चोरून नेऊ नयेत यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून आंब्याच्या झाडासी आपले ठाण मांडुन रात्री रक्षणासाठी जागली राहणे सुरु केले होते .शनिवारी ते आंब्याच्या झाडाशेजारी झोपी गेले असता पहाटे तीनच्या सुमारास वाघाने त्यांच्यावर प्राण घातक हल्ला करत त्यांचे डोक्यावर पंजा मारुण डोके चिरले.
वाघाने हल्ला करताच केशव पारसे यांनी जोरदार किंकाळी फोडली असताना परिसरातील शेतकरी त्यांच्या दिशेने धावले . नागरिकांनी आवाज केल्याने वाघ जंगलात पळून गेला.
परिसरातील शेतकऱ्यांनी जखमीला शिरपूर गावात आणून घटनेची माहिती शिरपूर, भुयारी, खैरी गटग्रामपंचायतचे सरपंच गौरिशंकर गजभिये यांना दिली त्यानंतर घटनेची माहिती हिंगणा वनमजूर हिरामण पाटील यांना दिली असता त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अब्दुल वाहीद शेख यांना माहिती कळविली . वनपरिक्षेत्र अधिकारी व वनमजूर घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेत सकाळी ६ .३० वाजता जखमी केशव पासरे यांचेवर कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केले .डॉक्टरच्या सलल्याने जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे भरती केले असून जखमीवर उपचार सुरु आहे.