नागपूर / अरूण कराळे :
वाडी , दत्तवाडी येथील त्रिलोक नगर,इंद्रायणी सोसायटी,सत्यसाई सोसायटी,श्रीकृष्ण नगर ,धम्मकीर्ति नगर, गजानन सोसायटी ,समर्थ गजानन सोसायटी येथील घरगुती नळाला आठ दिवसापासून पाणीच आले नाही त्यामुळे येथील महीला आक्रमक होऊन रविवार २३ जुन रोजी दुपारी ३ वाजता इंद्रायणी सोसायटी मधील पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन केले . महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामार्फत तुम्हाला उन्हाळ्यात पाणी पुरवठा करू असे आश्वासन देऊन वाडीतील बहुतांश भागातील नागरीकांनी वेळेवर ७ ते १० हजार रुपये खर्च करून नवीन नळ कनेक्शन घेतले परंतु आठ आठ दिवस नळाला पाणी पुरवठा होत नसल्यामुळे शेवटी शेकडो़ महीला आक्रमक होऊन पाण्याच्या टाकीला घेराव घातला .
आठ दिवसापासून आम्हाला पाणी नाही .यानतंर कोणालाच पाणी दयायचे नाही असे म्हणून नळ सोडण्याचा लोखंडी रॉड जप्त केला .काही नागरीक नळ सोडणाऱ्यांना पैसे देऊन आपल्या भागात पाणी सोडवून घेतात असा आरोप भाजपाचे मंडळ महामंत्री राम अवलंब यादव यांनी केला .मजीप्राच्या अभियंतांना पाणी सोडण्याविषयी फोन केला तर थातुरमातुर उत्तर देऊन पाणी सोडण्यासाठी सहकार्य करीत नसल्याचा आरोप नगरसेवक नरेंद्र मेढें यांनी केला .टाकीजवळ असामाजिक तत्वाचा अड्डा बनला असून येथे मात्र पाणी सोडणे या कामाकडे लक्ष न देता जुगार अड्डाच बनला आहे . असा आरोप परिसरातील नागरीकांचा आहे . काही भागात पाणी भरपूर मिळत असून काही भागात पाणीच मिळत नाही यासाठी आमदार भेदभाव करीत असल्याचा आरोप शारदा ठाकरे या महीलांनी केला . महीलांनी सांगीतले की मजीप्राचे अभियंता नरेश शनवारे , फोनच उचलत नाही . श्री पालथे म्हणतात की मी नियोजनानुसार पाणी सोडू तुम्ही मला काय सांगता असाही आरोप महीलांचा आहे .
पाण्याची गंभीर समस्या दोन दिवसात सोडविली नाही तर पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा निर्धार शारदा ठाकरे , वैशाली पोहनकर, भाग्यश्नी काळे , वैशाली आंदे यांनी व्यक्त केला . उपस्थित महीला व पुरूषांनी मजीप्रा तसेच नगर परिषदच्या विरोधात मुर्दाबादचे नारे लावून येणाऱ्या निवडणूकीवर बहीष्कार टाकण्याचा निर्धार केला . महीलांनी सांगीतले की मजीप्राच्या अधिकाऱ्यांना फोन केला की सांगतात आज सुट्टी आहे उदया या विषयावर बोलू अशी अधिकाऱ्यांची भाषा आहे . पाणी तर येवढे पिवळे आहे की त्या पाण्याची दुर्गंधी सुद्धा येत आहे . काही महीलांनी घरुनच बॉटल मध्ये पाणी आणले होते .या आंदोलनात नगरसेवक नरेंद्र मेंढे, भाष्करराव रिनके, रामप्रसाद पटले, ज्ञानेश्वर गोलाईत, तुकाराम धारपुरे ,मनोज भागवतकार,राजेन्द्र पाटील, दिलीप हातमोडे ,सुरेश मिश्रा,कला खण्डारे, सुनीता हातमोडे ,सरिता पाटील,शारदा ठाकरे,वैशाली पोहनकर, रीना कांबळे ,भीमराव मानवटकर,पुंडलिक हरडे ,अशोक कोल्हे,चंद्रशेखर बनसोड ,मोरेश्वर वानखडे,जनार्धन पाटील, शरद आंदे ,शारदा ठाकरे,भाग्यश्री काळे ,शिला खेडकर,रमेश येवले,रामकृष्ण चांदुरकर,वैशाली पोहनकर,सरिता पाटिल,लक्ष्मी बोकाडे, छाया वानखडे,कांचन येवले आदी सह शेकडो महीला उपस्थित होते . मोठया प्रमाणात आंदोलन वाढत असल्यामुळे शेवटी वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले . या विषयी मजीप्राचे अभियंता नरेश शनवारे व पालथे यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही .