मरावे परी वृक्षरुपी उरावे
चोखांद्रे परीवाराचा स्तुत्य उपक्रम
नागपूर / अरूण कराळे:
कोणत्याही अनिष्ट चालीरीती रुढी परंपरा न मानता वृध्दपकाळाने निधन झालेल्या आईवर पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार करुन लाव्हा येथील चोखांद्रे परिवाराने इतर समाजापुढे आदर्श ठेवला . नदीमध्ये रक्षा विसर्जन करून नदी अस्वच्छ करण्यापेक्षा रक्षा शेतीत पसरविली तर शेतीच्या फायदयाची आहे . हाच आदर्श ठेवून आईच्या स्मृती म्हणून तिथे पिंपळाचे झाड लावून उपस्थित नागरीकांनी परिसरात वृक्षारोपण केले . महाराष्ट्र अंधश्रद्धा ' निर्मुलन समीतीचे वाडी येथील कार्यकर्ते प्रकाश चोखांद्रे ,ग्रामविकास अधिकारी नरेश चोखांद्रे यांची आई तसेच लाव्हा ग्रामपंचायतचे उपसरपंच महेश चोखांद्रे यांची आजी भागूबाई श्यामराव चोखांद्रे वय ८३ यांचे बुधवार २० जून रोजी वृध्दपकाळाने निधन झाले चोखांद्रे कुटूंबीयांनी शेतातच अंत्यविधी पार पाडून वृक्षारोपण केले .आईचे नावे पिंपळ वृक्ष लावला .
यावेळी खंडविकास अधिकारी किरण कोवे ,पं.स. उपसभापती सुजित नितनवरे,कृषी अधिकारी एस.के. पवार, माजी सरपंच रॉबीन शेलारे,कृष्णा एंबेवार,रवी ढाकने,दिपक गणवीर,सूनिल खोब्रागडे,लाव्हाचे ग्रामसचिव विकास लाडे ,माधव चोखांद्रे , मंगेश चोखांद्रे,भारत नितनवरे,गौरव आडणे,अशोक धोंगळे,भागवत आवळे,बंडू ढोणे,सूरेश ऊके,योगेंद्र भालादरे,दामोदर ढोणे,उत्तम उके, राकेश चोखांद्रे, शशिकला चोखांद्रे ,छाया चोखांद्रे,आशा चोखांद्रे ,पुष्पा चोखांद्रे ,बंडू माटे प्रामुख्याने उपस्थित होते.