नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवेगाव खैरी येथील ३३ कि. व्हो. वीज वाहिनीची देखभाल - दुरुस्ती करणे अत्यावश्यक असताना देखील ओसीडब्लू यासाठी परवानगी देत नसल्याने या वाहिनीवर सातत्याने बिघाड होऊन शहरातील पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.न
नवेगाव खैरी येथील ३३ कि. व्हो. वीज वाहिनीची लांबी २८ किलोमीटर लांब असून पेंचच्या जंगलातून जात असल्याने यात बिघाड झाल्यास तो तपासून दुरुस्त करण्यास बराच कालावधी जातो. मागील ५-६ दिवसापासून संध्याकाळच्या वेळी ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागते आहे. परिणामी जंगलातून जाणाऱ्या नवेगाव खैरी येथील ३३ कि. व्हो. वीज वाहिनीवर अनेकदा झाडाच्या फांद्या तुटून पडून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडतात.
सोबतच पावसाळ्यात सुरुवातीच्या काळात वीज चकाकत असल्याने त्या वीज वाहिन्याकडे आकर्षित होतात परिणामी वीज वाहिन्यांवरील डिस्क इन्सुलेटर अथवा पिन इन्सुलेटर फुटल्याने देखील वीज पुरवठा खंडित होतो. शुक्रवारी डिस्क इन्सुलेटर फुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.