नागपूर, ८ जून २०१९. जेएसएल लाइफस्टाइल लिमिटेडच्या अधिपत्याखालील भारताचे आघाडीचे प्रीमिअम होम-वेअर आणि होम-स्पेसेस ब्रॅण्ड्स आडिनॉक्स आणि आर्क यांनी आज महाराष्ट्रातील नागपूरमध्ये त्यांच्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन केले. श्रीमती विलासिनी नायर नायरसन्सच्या संचालिका आणि नागपूर महिला क्लबच्या अध्यक्षा आणि श्री. वीरेंद्र खरे, प्रिन्सिपल आर्किटेक्ट,वी.के.असोसिएट यांच्या हस्ते या स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. स्टोअर उद्घाटनाच्या भव्य समारोहानंतर श्री. वीरेंद्र खरे यांनी केक कापत स्टोअर उद्घाटनाचा आनंद साजरा करण्यात आला. उत्पादन गॅलरी पाहून आनंदित झालेले श्री. वीरेंद्र खरे म्हणाले, ''मला येथे असण्याचा खूप आनंद होत आहे. मी आडिनॉक्सला शुभेच्छा देतो. मला होमवेअर रेंज खूप आवडते. या रेंजमधील डिझाइन्स उत्तम व आकर्षक आहेत. तसेच किचन डिझाइन्स देखील सर्वोत्तम व आकर्षक आहेत. फिनिशेस व फिटिंग्ज इतके अद्भुत आहेत की, प्रत्येकाला त्यांच्या घरामध्ये ते असावे असेच वाटेल. मी सर्वांना या स्टोअरमध्ये येऊन रेंज पाहण्याचे आणि त्यांच्या घरामध्ये आडिनॉक्स अनुभवाची भर करण्याचे आवाहन करतो!'' सुश्री विलाससिंह नायर निदेशक आणि अध्यक्ष
हे स्टोअर नागपूरमधील होम इंटीरिअर्ससाठीचे हब काँग्रेस नगर या मुख्य स्थानी स्थित आहे. हे स्थळ स्थानिक निवासी व पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. स्टोअर आठवड्यामध्ये कामकाजाच्या दिवशी म्हणजेच सोमवार ते शनिवार सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असते. आता शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आडिनॉक्स स्टोअरमध्ये महत्त्वाकांक्षी राहणीमानासाठी सर्वात लोकप्रिय जीवनशैली ब्रॅण्डचा समावेश आहे. याबाबत बोलताना जेएसएल लाइफस्टाइलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनदीप सिंग म्हणाले, ''जेएसएलएलला तिचे दोन आयकॉनिक ब्रॅण्ड्स – आडिनॉक्स व आर्कसाठी ऑरेंज सिटीमध्ये पहिल्या स्टोअरच्या उद्घाटनाचा अभिमान वाटतो. काँग्रेस नगर हे शहरातील मुख्य ठिकाण आहे. म्हणूनच आम्हाला विश्वास आहे की, स्टोअर अत्यंत यशस्वी ठरेल. आम्हाला आमच्या फ्रँचायजी भागीदार श्रीमती स्वाती श्रीवास्तव यांच्यासह सहयोग जोडण्याचा आनंद होत आहे. आम्ही त्यांच्यासह प्रांतामध्ये आमचे पहिले पाऊल टाकत आहोत. या संधीसह आम्ही शहरातील आमच्या ग्राहकांना आमच्या वैविध्यपूर्ण व विशिष्ट कार्यात्मक डिझाईन्स् दाखवतो. आम्ही त्यांच्या समुदायाचा भाग बनत स्टीलमधील सर्वोत्तम कला दाखवण्यासाठी आमची प्रतिष्ठा स्थापित करत आहोत.''
'आर्ट इन स्टेनलेस स्टील' हे आपले नाव कायम ठेवत आडिनॉक्स प्रीमिअम डिझाइन्स स्टेनलेस स्टीलच्या अवतीभोवती फिरतात. या डिझाईन्स् त्यांची आकर्षकता कायम ठेवतात, तसेच या डिझाईन्समध्ये डिझाइनला परिपूर्ण रूप देण्यासाठी क्रिस्टल, काच, सिरॅमिक, लाकूड, दगड अशा साहित्यांचा समावेश आहे. अव्वल आंतरराष्ट्रीय व भारतीय डिझायनर्सनी त्यांच्या कौशल्यांसह ब्रॅण्डसाठी रेंजची निर्मिती केली आहे. आडिनॉक्स ने किचन युनिट्स, टेबलवेअर व होम डेकोरच्या आकर्षक डिझाइन रेंजसह अनेकांची मने जिंकली आहेत. आडिनॉक्स मधील रेंजबाबत बोलताना जेएसएल लाइफस्टाइलच्या व्यवस्थापकीय संचालिका व क्रिएटिव्ह हेड श्रीम. दीपिका जिंदाल म्हणाल्या, ''आमचा समकालीन आकर्षकता असलेली कला निर्माण करण्याचा प्रयत्न राहिला आहे. दशकाहून अधिक काळापासून आम्ही स्टेनलेस स्टीलसह नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. आम्ही वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची रेंज निर्माण करण्यासाठी स्टेनलेस स्टीलसह काच, लाकूड व सिरॅमिक सारख्या इतर साहित्यांचा देखील वापर करतो. जागतिक कला व संस्कृतीमधून प्रेरणा मिळालेल्या आमच्या डिझाइनर्सच्या क्रिएटिव्ह व्हिजनच्या प्रतिसादासह तयार करण्यात आलेल्या आमच्या कलेक्शन्समध्ये क्लासिकल व समकालीन रचनांचे संयोजन आहे. आणि मी नागपूरमधील आमच्या नवीन स्टोअरसह हे कलेक्शन शेअर करण्यासाठी उत्सुक आहे.''
१००० चौरस फूट जागेवर विस्तृत पसरलेले हे स्टोअर व्यापक कलेक्शन असलेल्या होम-वेअर व होम-स्पेसेस विभागामधील विविध पर्याय देते. होम-वेअर रेंजमध्ये टेबलवेअर, कलाकृती, क्रॉकरी, डिनर-सेट्स, वॉल डेकॉर वस्तू यांसह गिफ्टिंग आणि स्वत:च्या वापरासाठी विविध रेंजचा समावेश आहे. दुसरीकडे होम-स्पेसेस विभागामध्ये किचन्स, व्हॅनिटी व वार्डरोब सोल्यूशन्सची व्यापक रेंज आहे. उद्धाटनाप्रसंगी जेएसएल लाइफस्टाइलच्या फ्रँचायजी पार्टनर श्रीम. स्वाती श्रीवास्तव म्हणाल्या, ''मला आनंद होत आहे की, आपल्याकडे शहरामध्ये आता आडिनॉक्स व आर्क हे प्रीमिअम ब्रॅण्ड्स आहेत आणि ही आमच्यासाठी एक नवीन सुरूवात आहे. नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय होम फॅशन ट्रेण्ड्स आणण्याच्या प्रयत्नांमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांसाठी शेल्फवर दर्जात्मक डिझाइन्स आणण्यामध्ये यशस्वी ठरू. आम्ही हा व्यवसाय यशस्वी ठरण्याची आशा करतो. जिंदाल स्टेनलेसचे पाठबळ मिळालेल्या जेएसएल लाइफस्टाइल या अत्यंत विश्वसनीय समूहासह सहयोगी असण्याचा आमच्यासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे.''
एकूण आडिनॉक्स व आर्क आजच्या खर्च करत खास आधुनिक राहणीमान असण्याची इच्छा असलेल्या महिला व तरूण पिढीसाठी उत्तम रेंज देतात. आंतरराष्ट्रीय दर्जासह ब्रॅण्ड्स त्यांच्या मुलभूत एचएनआय ग्राहकांना सर्वोत्तम जीवनशैली रेंज देतात. कंपनी देशातील एक खास लाइफस्टाइल ब्रॅण्ड असून व्यवसाय विकसित करण्यासाठी भारतभरातील उपस्थिती वाढवण्याचा दृष्टिकोन ठेवते.