वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे
पोलीस स्टेशन वाडी अंतर्गत येणाऱ्या व लाव्हा ग्रामपंचायत हद्दितील फेटरी रोड वर माँ भवानी दालमिल ला दुपारी ४ च्या सूमारास अचानक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनूसार माँ भवानी दालमिल ही लाव्हा येथील निवासी येथे विष्णू वानखेडे वय ४२ यांच्या मालकीची असून येथे डाळ तयार होत असून येथेच गोडाऊन असल्याने डाळ येथेच साठविल्या जाते.तसेच याच गोडाऊन मध्ये सामोरच्या खोलीत नागपूर येथील रहिवासी जितेंद्र बकणे यांचा अगरबत्ती निर्मीतीची कारखाना असल्याने अगरबत्ती ही गोडाऊन मध्ये साठवून होती.आज ता 7 जून ला दुपारी 2 वाजताच्या सुमारास अगरबत्ती मालक गोदाम बंद करून घरी गेले होते.
दुपारी 4 वाजताच्या दरम्यान डाळ मिलचे मालक विष्णू वानखेडे यांनी डाळीचे गोदाम उघडले असता अगरबत्तीच्या गोदमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या शेजाऱ्यांना बोलावून अग्निशामक दलाला सूचना दिली या घटनेची माहिती मिळताच वाडी नगर परिषद अग्निशमन दलाचे रोहित शेलारे,सचिन मानकर आनंद शेंडे, अनुराग पाटील,हार्दिक साहन तसेच
महानगर पालिका अग्निशमन अधिकारी राजेन्द उचके,चालक श्रीराम डेंगे,भगवान मारबते,रमन बैसवारे,आनंद गायधने यांनी आगेला नियंत्रनात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.आग कशामुळे लागली याचे नेमके कारण लक्षात आले नसून आगीत डाळ मिल मालकाचे सात लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून अगरबत्ती मालकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.