Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून २२, २०१९

टाटा इन्ट्रा या भारतातील पहिल्या कॉम्पॅक्ट ट्रकचे नागपूरमध्ये अनावरण



नागपूर, २१ जून २०१९: स्मॉल कमर्शिअल व्हेइकल (एससीव्ही) प्रकारात अग्रणी आणि नेतृत्वस्थानची कंपनी ही आपली ओळख दृढ करत टाटा मोटर्स या भारतातील व्यावसायिक वाहनांच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने आज नागपूरमध्ये टाटा इन्ट्रा ही नव्या पिढीतील कॉम्पॅक्ट ट्रकची नवी श्रेणी सादर केली. या वर्गातील आघाडीची वैशिष्ट्ये देण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या या ट्रकमध्ये एससीव्ही उद्योगातील वाढत्या आणि सतत बदलणाऱ्या सर्व मागण्या पूर्ण होतात. टाटा इन्ट्रा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे - व्ही१० आणि व्ही२०. इन्ट्राची रेंज ५,३५,००० रुपयांपासून सुरू होते. विविध प्रकारांनुसार ही किंमत बदलेल. त्यामुळे, ग्राहकांना किंमतीचे उत्कृष्ट मूल्य मिळते. नागपूरमधील वर्धमान नगर कॉलनीतील ७ वचन येथे आयोजित या समारंभाला टाटा मोटर्सच्या ५२० ग्राहकांनी हजेरी लावली. नागपूरमधील टाटा मोटर्सच्या सर्व अधिकृत वितरकांकडे हे दोन्ही ट्रक उपलब्ध आहेत.

नागपूरमध्ये टाटा इन्ट्राचे अनावरण करताना टाटा मोटर्सच्या कमर्शिअल व्हेइकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष श्री. गिरिश वाघ म्हणाले, "महाराष्ट्र हा आमच्यासाठी महत्त्वाचा प्रांत आहे आणि याआधीच्या आमच्या बीएसआयव्ही रेंजच्या सादरीकरणानंतर आम्ही इथे इन्ट्रा सादर करत आहोत. टाटा इन्ट्रा अशा ग्राहकांसाठी सुयोग्य आहे, ज्यांना अधिक महसूल आणि परतावा मिळवत टोटल कॉस्ट ऑफ ओनरशीप (टीसीओ)साठी नवे वाहन घ्यायचे आहे आणि दीर्घकाळाच्या प्रवासातही आरामदायी वाटेल अशी खात्री देणारे विश्वासार्ह व सिद्ध वाहन हवे आहे. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये भारतातील पहिला कॉम्पॅक्ट ट्रक सादर करून आम्ही भारतीय एससीव्ही बाजारपेठेतील दरी भरुन काढली आहे आणि टाटा एसच्या अभूतपूर्व यशानंतर आता पुन्हा एकदा बाजारपेठेतील संकल्पना बदलून टाकणारे उत्पादन आम्ही सादर करत आहोत. या वाहनासोबत, या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट म्हणजेच २ वर्षे अथवा ७२००० किमी (जे आधी असेल ते)ची वॉरंटी आहे. तसेच सेल्स, सर्विस आणि सुट्या भागांसाठीच्या देशभरातील व्यापक सुविधांचाही फायदा ग्राहकांना होईल."



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.