Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून ०६, २०१९

इको-प्रोसंस्थेच्या पर्यावरण विभागाकडून रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी शहरात ठिकठिकाणी जनजागृती

चंद्रपूर/प्रतिनिधी:


जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत इको-प्रो संस्थेने आजपासून रेनवॉटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियानाची सुरवात केली. चंद्रपूरसह संपूर्ण देशात भूजलपातळी खालावत आहे. याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.एकीकडे प्रचंड उष्णता, कमी पर्जन्यमान, पावसाचे दिवस कमीझाले आहे. असे असतानाही उद्योग,नागरिकांकडून बोअरवेल खोदण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या जिरण्याची गतीआधीच कमी आहे. अलीकडे सर्वत्र मोठ्या प्रमाणात क्रांकिटच्यारस्त्याचे जाळे निर्माण होत आहे.घराच्या आंगणात फर्लोरिंग,काँक्रिटमुळे पाणी जिरण्याचे प्रमाणकमी झाले आहे. त्यामुळे पाण्याचीपातळी शहरातही दोनशे फुटांपेक्षाअधिक खोलवर गेलेली आहे. यावरउपाय म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इको-प्रो संस्थेतर्फे रेनवॉटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्यामाध्यमाने शहरात सर्वत्र जनजागृतीकरीत पावसाचे पाणी बोअर-विहिरीळा पुनर्भरण करण्यासंदर्भात तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प तयार करण्या संदर्भातजनजागृती करण्यात येत आहे.इच्छुक नागरिकांना संस्थेतर्फे तांत्रिकसहकार्य आणि माहिती देण्यात येणारआहे. अभियानाची सुरवात शहरात ठिकठिकाणी पत्रके वाटप करूनकरण्यात आली.

अभियान इको-प्रो संस्थेच्यापर्यावरण विभागाच्या वतीने राबविण्यातयेत आहे. इको-प्रो संस्थेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख नितीन रामटेकेयांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्याया उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, नितीन रामटेके, सुधीर देव,अमोल उट्टलवार, बिमल शहा, सुनीलपाटील, बंडू दुधे, राजू काहीलकर, प्रमोद मलीक, सचिन धोतरे, ओमवर्मा, स्वप्नील रागीट सहभागी झाले होते.

शहरातील भूगर्भातीलपाण्याची पातळीवाढावी, याकरिताज्यांच्याकडे बोअर,विहीर आहे. अशा सर्व नागरिकांनीस्वयंस्फुर्तपणे रेनवॉटरहार्वेस्टींग करण्यास पुढेयेण्याची गरज आहेनव्याने बोअर-टयूबवेल  खोदण्याव सुडअसणे गरजेचे आहे.- 
बंडू धोतरे,

अध्यक्ष इको-प्रो संस्था चंद्रपूर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.