Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून ०६, २०१९

धक्कादायक:पतीवर संशय घेऊन पत्नीने पतीवर केला कुऱ्हाडीने हल्ला;लगेच पत्नीने नदीत उडी घेऊन केली आत्महत्या

चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:


पतीवर संशय घेऊन पत्नी पतीवर कुराडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर पासून काही अंतरावर असलेल्या घुग्गुस नकोडा येथे घडली आहे. अर्चना सोयाम व बबलू सोयाम असे या दोन्ही मृतकांचे नावं आहेत. विशेष म्हणजे पती झोपेत असतांना रात्री 3 च्या सुमारास पत्नी ने हत्या केली. 

त्यानंतर पत्नी ने नकोडा येथे लागूनच असलेल्या वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती घुग्गुस पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व दोघांचे शव शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले आहे. या घटनेचा पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहेत.
कुक्कुटपालन पोल्ट्रीफीड उपलब्ध


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.