रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरातील मध्यभागी असलेल्या प्रसिद्ध गुलवाडे हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली.श्रीलता इदनुरी असे मृत महिलेचे नाव असून तिला गुरवारी सकाळी प्रसूतीसाठी गुलवाडे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.तर प्रसूती सुरु असतांना बाळाला सुरक्षित जन्म देत मातेचा मृत्यू झाल्याने रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत इदनुरी परिवाराने रोष व्यक्त केला.रुग्णालय परिसरात वातावरण चीघडल्याचे समजताच याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.तसेच दंगा नियंत्रण पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते.
चुकीच्या पद्धतीने तिच्यावर उपचार करून तिचा मृत्यू झाला.असा आरोप तिच्या पतीने व नातलगांनी केला आहे.तर तिचे बाळ सुरक्षित असल्याची माहिती आहे.
यात डॉक्टरांची चूक नसून प्रसूती काळात महिलाच रक्तदाब वाढल्याने महिलेने उपचारावर प्रतिसाद देणे बंद केले,आम्ही आमच्या परिपूर्ण प्रयत्न केले मात्र बाळाला वाचविण्यात यश आले.