ललित लांजेवार/नागपूर:
चंद्रपूर एका ३६ वर्षीय युवकाचा धारधार शस्त्रानं खून झाल्या नंतर या खुनाच्या घटनेनं जिल्हा हादरला आहे. चंद्रपूरच्या लालपेठ कॉलरी भागात जुन्या वादातून बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात वाद असलेल्या युवकासह संजूवर धारधार शस्त्रानं हल्ला केला.
संजू झुनमुलवार असं मृतकाचं नाव आहे.चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील लालपेठ कॉलरी वसाहतीत घडलेल्या खुनाच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. योग्य उपचाराआधीच संजू झुनमुलवार या युवकाचा मृत्यु झाला तर दुसऱ्यावर शर्तींचं उपचार सुरु आहे.