चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ मधील वादग्रस्त उपविभागीय अभियंता उदय भोयर यांच्यासह नागपूर विभागातील १७ उपअभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.
यात चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्पातील उपअभियंता टी.व्ही. हंद्राळे यांची बदली उदय भोयर यांच्या ठिकाणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग २ मधील पी.पी. जोशी यांची बदली टी.व्ही. हंद्राळे यांच्या जागी करण्यात आली आहे.
नागपूरच्या विशेष प्रकल्पातील उपकार्यकारी अभियंता अश्विनी यलचटवार यांची बदली काटोल येथे,
रामटेक उपविभागातील ललित होळकर यांची बदली नागपुरात दक्षता व गुणनियंत्रण मंडळात करण्यात आली आहे.
काटोल येथील अरुण कुचनवार यांची बदली गोंदिया येथील उपविभाग क्रमांक १ मध्ये,
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील व्ही. एन. दोरखंडे यांची बदली वरोरा येथे,
जिल्हा परिषद राजुरा उपविभागातील आर.व्ही. कुकडे यांची बदली गडचिरोली येथे,
हिंगणा जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील पी.एम. गावंडे यांची बदली मौदा उपविभागात करण्यात आली आहे.
दक्षता व गुणनियंत्रण मंडळातील उपअभियंता शालिनी कुटेमाटे यांची बदली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उपअभियंता म्हणून करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली येथील उपकार्यकारी अभियंता पी.टी. जीवतोडे यांची बदली चंद्रपुरात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग सिरोंचा येथील आर.आर. तलमले यांची बदली नागपूर येथे जागतिक बँक प्रकल्प उपविभाग १ मध्ये,
सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलू येथील ए.एस. तोडे यांची बदली नागपूर येथील जागतिक बँक प्रकल्प उपविभाग २ मध्ये,
आरमोरी येथील ए.आर. मोरे यांची बदली कुरखेडा उपविभागात करण्यात आली आहे.
नागपूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उपअभियंता रामराज ठाकूर यांची बदली नागपुरात दक्षता व गुणनियंत्रण मंडळात करण्यात आली आहे.
दक्षता गुणनियंत्रण मंडळ उपविभागातील उपअभियंता राजेश डोरले यांची बदली मुख्य अभियंता कार्यालयात करण्यात आली आहे.
चिमूर येथील ई.एल. टिकले यांची बदली सिरोंचा येथे करण्यात आली असून यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ रूजू होण्यास बजावण्यात आले आहे.
उदय भोयर यांची बदली नागपुरातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ३ मध्ये करण्यात आली. तेथील उपविभागीय अभियंता देशमुख हे येत्या ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. या रिक्त होणाऱ्या जागेवर भोयर यांची बदली करण्यात आली आहे.