नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली खदखद
नागपूर - बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या नावाखाली अलुतेदार आणि बलुतेदार समाजाच्या लोकांची मते मागून दिशाभूल करीत असल्याचा आरोप नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. स्वतःच्याच जाणीवपूर्वक चुकांमुळे वंचित आघाडी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धक्कादायकरित्या खाली कोसळेल, अशी खदखद त्यांनी मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर ऐन मतमोजणीच्या तोंडावर व्यक्त केली.
यावेळी मिलिंद पखाले म्हणाले, 2015 ते 2017 या जवळपास तीन वर्षे राबविलेल्या काळात जाती अंत होईल अशी अपेक्षा होती. पंरतु, स्वहित जोपासण्याकडे लक्ष आणि दुरद्रुष्टीचा अभाव असल्यामुळे वंचित आघाडी बोगस ठरली. डॉ . बाबासाहेब आंनेकांनी आम्हाला माणूसपण दिले. ते माणूसपणच आज धोक्यात आले आहे. ते माणूसपण हिरावून घेण्यासाठी प्रतिक्रांतीचे एक एक पाऊल पडत आहे. अशी आजची परिस्थीती भयावह झाली आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. आंबेडकरी समाजाच्या अनेक प्रश्नांनवर वंचित बहुजन आघाड़ी एक ही शब्द बोलत नाही. गाव, तालुका, जिल्हा स्तरावरील मागील 35 वर्ष तयार झालेला आंबेडकरी भारिप बहुजन महासंघ बरखास्त करून सरसकट संपविला आहे.