नागपूर/ललित लांजेवार:
जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ वाघीनींचे आजवर तुम्ही अनेक किस्से ऐकले किंवा बघितले असाल ,यात वन मजुरांचा जेवणाचा डबा पळविणे,घमेला पळविणे,तर कधी दुधाची बाटली पडविणे,मात्र आता तर वाघिणीच्या बछद्यानी हद्द केली,आता चक्क पर्यटकाचा कॅमेराच पळविला आहे.
सोमवारी ताडोबात जंगल सफारीसाठी आलेल्या वन्यजीव छायाचित्रकार रिटायर्ड कर्नल डॉ. अरुण रस्तोगी जंगल भ्रमण करत होते.अश्यातच जंगलसफारी करत असतांना त्यांना छोटी तारा वाघीण दिसली.त्यांनी तिच्याकडे कॅमेरा करत फोटो काढणे सुरु केले. मात्र रस्तोगी यांचा कॅमेरा अचानक त्यांच्या हातातून सुटला व तो गाडीत न पडता जंगलात खाली पडला,जंगल परिसरात कोणतीही वस्तू पडली कि ती उचलू शकत नाही किव्हा कोणी गाडीच्या खाली उतरू शकत नाही असा नियम आहे.
कॅमेरा खाली पडताच आवाज झाला,अन जवळच असलेली छोटी तारा व वाघिणीच्या छाव्यांनी त्यावर झडप घेतली.कॅमेऱ्याचा वास घेत बछड्यानी पहिल्याच खेपेत कॅमेऱ्याच्या सिग्मालेन्सचे लचके तोडले,असे एक एक करत संपूर्ण कॅमेराच निस्तनाभूत केला. या कॅमेऱ्याची किंमत २ लाखापेक्षा अधिक असल्याचे समजते आहे.
उन्हाळा असल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्पात फुल गर्दी आहे.अश्यातच जंगलातील प्राणी हे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात ,हौशी छायाचित्रकार हे त्या ठिकाणी आपली गाडी उभी करून वाघ व अन्य प्राणी येण्याची वाटबघत असतात,प्राणी येताच त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात.पाण्याच्या शोधात प्राणी पाणवट्यावर येत असल्याचे पर्यटकांना पाठवठ्यावर वन्य प्राण्याचे हमखास दर्शन होऊ लागले आहे.