Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ०८, २०१९

मर्क लिमिटेडचे नामकरण आता प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेड







प्रॉक्टर अँड गॅम्बल समूहाचा भाग म्हणून नवे नाव आता सूचिबद्ध कंपनीची नवी ओळख प्रतिबिंबित करणार
मुंबई, ०८ मे २०१९ : प्रॉक्टर अँड गॅम्बल समूहाच्या जागतिक हस्तांतरणाचा भाग म्हणून ग्राहक आरोग्य व्यवसायात आघाडीवर असलेल्या डर्मस्टॅड येथील मर्क केजीए कंपनीचे हस्तांतरण करण्यात आले असून याला मुंबई, महाराष्ट्रातील कंपनी निबंधकाने (रजिस्ट्रार ऑफ कंपनीज) मान्यता दिली आहे. त्यामुळे आता मर्क लिमिटेड ही कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेड या नावाने ओळखली जाणार आहे. सहा मे २०१९ पासून हे नवे नाव लागू होईल.


या नव्या नामकरणाबद्दल प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद थत्ते यांनी सांगितले की, “भारतातील ग्राहक आरोग्य व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेडसाठी (पूर्वीची मर्क लिमिटेड) आकर्षक असे नवे पर्व आजपासून सुरू होणार आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बल समूहाचा एक भाग असलेले आमचे नवे नाव हे आमची नवी ओळख प्रतिबिंबित करणार असून या एकत्रिकरणामुळे आम्ही ग्राहक आरोग्य व्यवसायातल्या नव्या क्षमता आणि परंपरेने समृद्ध झालो आहोत. आजच्या गरजा आणि उद्याच्या संधींचा फायदा घेण्यासाठी आम्ही दोघेही आपापल्या कौशल्यांचा वापर करून वेगवेगळ्या श्रेणी व वेगवेगळे ब्रँड विकसित करण्यासाठी काम करत आहोत.


प्रॉक्टर अँड गॅम्बल समूहाच्या जागतिक हस्तांतरणाचा एक भाग म्हणून ग्राहक आरोग्य व्यवसायात अग्रेसर असलेल्या जर्मनीतील डर्मस्टॅड येथील मर्क केजीए कंपनीचे यशस्वी हस्तांतरण करण्यात आल्यानंतर भारतात सूचिबद्ध असलेल्या या कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ डिसेंबर २०१८ रोजीच ग्राहक आरोग्य व्यवसाय प्रॉक्टर अँड गॅम्बल समूहाकडे हस्तांतरित करण्यात आला होता.

प्रॉक्टर अँड गॅम्बलचे ग्लोबल पर्सनल हेल्थ केअरचे अध्यक्ष टॉम फिन यांनी सांगितले की, “भारतातील स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असणाऱ्या आमच्या प्रॉक्टर अँड गँबल हेल्थ लिमिटेड या कंपनीचे नामकरण करताना मला अत्याधिक आनंद होत आहे. आता आम्ही प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेड या नव्या नावाने ओळखले जाऊ. जागतिक विकास दरानुसार भारतातील ओटीसी मार्केट हे दुपटीने वाढत असून हा आमच्यासाठी आकर्षक असा टप्पा म्हणावा लागेल. आता भारतातील आरोग्य क्षेत्राशी निगडित प्रॉक्टर अँड गॅम्बल समूहाच्या दोन व्यवसायांना वाढीस नेण्यासाठी आम्ही पुढे जाण्याकरिता उत्सुक आहोत.”


प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेड हा अटा केमेरिच-केईल (पर्सनल हेल्थ केअर इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखालील प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या पर्सनल हेल्थ केअर इंटरनॅशनल व्यवसाय यूनिटचा भाग असून युरोप, लॅटिन अमेरिका आणि आशिया/आयएमईए (भारत, मध्य पूर्व आणि आफ्रिका) या खंडांमध्ये आरोग्य सेवा व्यवसाय केला जात आहे.

“या घडामोडीबद्दल आम्ही अतिशय आनंदी आहोत. डॉक्टर्स, फार्मासिस्ट आणि ग्राहकांचा विश्वास तसेच विज्ञानाचा पाठिंबा यासंह आमच्या ब्रँड्सचा सक्षम पोर्टफोलियो असून आम्ही भारतातील ग्राहकांना प्रदीर्घ, निरोगी आणि अधिक चांगले जीवन जगणे प्रदान करण्याइतपत सक्षम आहोत,” असे प्रॉक्टर अँड गॅम्बलचे पर्सनल हेल्थ केअर इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष अटा केमेरिच-केईल यांनी सांगितले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.