Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे १५, २०१९

वाळू तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त

सिंदेवाही तहसीलदार अमोल पाठक यांची कारवाई

प्रशांत गेडाम/सिंदेवाही

सिंदेवाही तहसीलदार  व्यस्त असताना देखील महसूल कोणी चोरी करू नये यासाठी तालुक्यात देखरेख कित्येक ग्रामीण भागात करीत असतात . त्यातच आज सिंदेवाही तालुक्यातील जवळच असलेला पवनपार मध्ये गावात सकाळी 6 वा. दरम्यान रेती भरूण ट्रॅक्टर पवनपार ग्रामपंचायत समोर खाली करत असताना करताना दिसले .असता सिंदेवाही तहसीलदार अमोल पाठक यांनी दिलेल्या आदेशान्वये नायब तहसीलदार ए.पी. सलामे  व भास्कर मेश्राम (शीपाई)  यांनी ट्रॅक्टर पकडला व पकडून  सिंदेवाहीकडे रवाना केला. सदर ट्रॅक्टर तहसिल चे आवारात आहे. तहसिलदार अमोल पाठक साहेब यांनी जप्तीची कारवाई केली आहे. 

ट्रॅक्टर क्र.– MH-34/P- 44 49 असा असून ट्रॅक्टर मालक-' बिपिन पोरेड्डीवार  ' रा.पवनपार ता. सिंदेवाही यांचा असल्याचे तहसील कार्यालय सिंदेवाही यांनी  सांगितले. पुढील कार्यवाही महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) चे उल्लंघन केल्यामुळे जमीन महसूल अधिनियम सदर ट्रॅक्टर वर 1 लाख 8 हजार 400 रुपये दंडात्मक कारवाई केली असून असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी चिमूर (SDO ) बेहरे साहेब यांच्याकडे पाठवण्यात आले आहे .असे माहिती सिंदेवाही तहसीलदार पाठक यांनी सांगितले आहे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.