खापा (घुडन ) अमरजीत जांभुळकर ,दि 9 मे
नरखेड तालुक्यातील घोगरा ग्रामपंचायत ही गट ग्रामपंचायत असून यात तीन गावांचा समावेश आहे ,घोगरा लोहारा व जुनेवानी यातील सर्वात मोठे गाव हे घोगरा असून येथे दुष्काळामुळे पिण्याच्या ,वापरायच्या पाण्याची भीषण टंचाई आहे ,सद्यास्तितीत दर दहा दिवस बाद गावात नळ येतो तो देखील अत्यल्प तर सरपंच यांचे स्थानिक असलेले गाव लोहारा येथे दररोज नळ येतो .
घोगरा ग्रामपंचायत ही आता 6 महिने आधी नव्याने निवडनुक होऊन बिनविरोध येथील सरपंच निवडून आले आहेत ,गावकऱ्यांच्या समस्या पूर्णपणे दूर होतील पिण्याच्या पाण्याची असो वा इतर यावर जनतेनी विस्वास ठेवून नवीन महिला सरपंच पण येथील करोभार नियुक्त सरपंच सांभाळत नसून त्यांचे पती संपूर्ण कारोभार सांभाळत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे ,
मागील 2 महिन्या पासून निर्माण झालेली पाणी टंचाईविषयी समस्येचे निराकरण यावर काही तोडगा काढण्या संदर्भात घोगरा येथील ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयी टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे ," मी लोहारा येथे असतो तुमच्या गावाची समस्या तुम्ही बघा " असली उत्तरे सरपंच यांचे पती यांच्या कडून मिळत असल्याचे संपूर्ण गावकऱ्यांचे म्हणणे आहे .
"आम्हाला हा ग्रामसेवच नको "
येथील महिलांनी तसेच गावकऱ्यांनी पाण्याच्या भीषण समस्येचे निराकरण होण्यासाठी काल दि 8 ला दुपारी 2 ला कुलूप ठोकले ,सरपंच व ग्रामसेवक यांच्या कडून नियमित मिळणारी असमाधान कारक उत्तरे यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले आहे ,ग्रामसेवक नियमित ग्रामपंचायत मध्ये येत नाहीच तर शाळकरी मुलांना काही महत्वाची कागदपत्रे लागल्यास वाट बघण्या शिवाय पर्याय नाहीच ,त्यामुळे आम्हा गावकऱ्यांना हा निष्क्रिय ग्रामसेवक नकोच असे येथील गावकऱ्यांचे मत आहे ,
कैलास डांगोरे (उपसरपंच घोगरा )
ग्रामसेवक व सरपंच हे गाव समस्येसाठी बेजबाबदार आहेत ,यांच्याशी मी व अन्य ग्रामपंचायत सदस्य यांनी पाणी समस्येवर चर्चा केली असता हे नियमित उडवा उडवीची उत्तरे देतात ,मी सरपंच या गट ग्रामपंचायतीचा जरी असलो तरी माझे गाव हे नाहीच तुमचं काय ते तुम्ही बघा " अशी उत्तरे यांच्या कडून मिळतात ,
प्रवीण लालचंद मानकर ,सदस्य घोगरा ,
आमच्या येथील निवडणूक होऊन 8 महिने झाले ,सरपंच बिनविरोध निवडून आल्या लोहारा येथील संगीता एस,घागरे , पण आम्ही या 5 महिन्याच्या कार्यकाळात कधी सरपंच यांना ग्रामपंचायत कार्यालयात बघितले नाही ,सर्व करोभार यांचे पतीच सांभाळतात ,
पाण्याची समस्या जो पर्यंत मिटणार नाही तो पर्यंत ग्रामपंचायत खुलणार नाही
ग्रामस्थ प्रशांत पेठे,
गावातील महिला आजू बाजूच्या शेतातून 1 किमी लांबी वरून पिण्याचे पाणी आणून आपली तहान भागवीत आहे ,संपूर्ण तालुका दुष्काळात असून खंडविकास अधिकाऱ्यांनी सरपंचाला पाण्याच्या व्यवस्थेसाठी लागेल तो खर्च करा असे आदेश दिले आहेच पण आमच्या येथील निष्क्रिय सरपंच गाढव झोपेतच आहे त्यांना जनतेची कसलीही चिंता नाहीच .