मायणी ः ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे) सन १९९५च्या दरम्यान माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी स्थापन केलेल्या अनंत इंग्लिश स्कूल मायणीय येथे सन१९९९मध्ये एस एस सी पास झालेल्या माजी विध्यार्थी यांचा स्नेह मेळावा उत्साह स्नेहपुर्ण वातावरणात पार पडला माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी सर्वांच्या समोर कथन करतानाशाळेच्या परिसराची आठवण जरी काढली तरी बालपणीच्या आठवणी जशाच्या तश्या जाग्या होतात आणि चालते-बोलते चित्र तयार होते.
आयुष्यात पुढे जात असताना बऱ्याच वेळा पुढे पाहण्याऐवजी मागे वळुन पहायला खूप आवडतं आणि जुन्या आठवणीत रमायला ही तितकेच आवडते. भूतकाळात झालेल्या चुका बरेच काही शिकवतात पण काही चुका परत कराव्यात अशीच ईच्छा मनात पुन्हा पुन्हा येते. पण ते गेलेले क्षण काही परत येत नाही अशा वेळी बरोबर असतात त्या या आठवणी..... आपल्या शालेय जीवनास पुन्हा एकदा उजाळा दिला या स्नेह मेळाव्यास शुभेच्छा देण्यासाठी मायणी गावचे कार्यक्षम युवा नेते स.सचिन गुदगे ,पल्लवी गुदगे, राजु कचरे,आयशा मुल्ला, मोहन दगडे,तत्कालीन शिक्षक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते या प्रसंगी युवा नेते स.सचिन गुदगे म्हणाले स्फूर्ती शिक्षण मंडळाचे कार्यरत शिक्षक व यांच्या मध्ये एकमेकांचे सुखदुःख जाणुन घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे आनेकांनी नोकरी व्यवसाय सुरू करून आपला समाजात चांगल्याप्रकारे अभिमानाने जगत आहेत मला सार्थ अभिमान आहे
प्रसंगी अनीता पाटोळे व शिवानी चोथे स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली माजी विध्यार्थी नवनाथ गाढवे व आसिफ इनामदार यांनी व्यवसाय सुरू करून सामाजिक जिवनात कसा हातभार लागेल याचे विचार व्यक्त केले तसेच संजय जावीर यांनी जिवनात कशी तडजोड करावी लागले हे सांगितले त्याच प्रमाणे भारतीय सेनेचे हमीद बागवान, नवनाथ सुर्यवंशी यांनी आनुभव व्यक्त केले व सलीम मुल्ला यांनी या शाळेमुळे आम्ही कसे घडलो याची माहिती दिली
या शाळेच्या उपकाराची परत फेड म्हणून माजी विध्यार्थी नी शाळेसाठी २१लाकडी बेंचा सेट शाळे साठी भेट म्हणून दिला या वेळी संचालक राजु कचरे,मोहन दगडे यांनी आपले विचार व्यक्त केले
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आनंदा शेवाळे, जोस्ना शिंदे, प्रियदर्शनी चोथे,सौ.पल्लवी गुदगे,रविंद्र शेठ बाबर,जेष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके, पांडुरंग तारळेकर,सतीश डोंगरे, चंद्रशेखर देशमुखे, दिपक खलीपे ,मुख्याध्यापक यलमर सर,शिक्षक वर्ग व कर्मचारी माजी विध्यार्थी व विध्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
हा कर्यक्रम पार पाडण्यासाठी अशिफ इनामदार, नवनाथ गाढवे,सलीम मुल्ला, सचिन भिसे,सचिन कारंडे,व संजय जाविर यांनी विशेष प्रयत्न केले शेवटी प्रा.सुनील यलमर सर यांनी आभार व्यक्त केले