Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे १४, २०१९

चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा ४ दिवस राहणार विस्कळीत




राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची निष्काळजी; मोठी जलवाहिनी केली क्षतिग्रस्त
चंद्रपूर दि. १४ मे - मूल रोड येथील रस्ता चौपदरीकरण कामादरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे निष्काळजीपणाने खोदकाम करूनशहरातल्या मोठ्या भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी क्षतिग्रस्त केल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून शहरातील ६० ते७० टक्के भागातील पाणीपुरवठा पुढील ४ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यतालक्षात घेता घेता महापौर अंजली घोटेकर, आयुक्त संजय काकडे व परिसरातील नगरसेवकांद्वारे जलवाहिनीची पाहणी करण्यात आली असून चंद्रपूरशहर महानगरपालिकेतर्फे सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे सावरकर चौक ते बंगाली कॅम्प ( मूल रोड ) येथील रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु आहे याच भागातून चंद्रपूर शहरमहानगरपालिकेची तुकूम जलशुद्धीकरण केंद्र ते बाबुपेठ येथील पाणीपुरवठा करणारी ५०० एम एम व्यासाची जलवाहिनी गेली आहे. याद्वारे शहरातीलबंगाली कॅम्प, बाबुपेठ, सहकार नगर, नेहरू नगर इत्यादी भागाला पाणीपुरवठा केला जातो, सोबतच केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणीपुरवठायोजनेअंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्याचेही काम जलद गतीने सुरु आहे, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला अवगत करण्यात आलेअसतांनासुद्धा निष्काळजीपणाने खोदकाम करून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे केले जात आहे. राष्ट्रीयमहामार्ग प्राधिकरणतर्फे येथील रस्ता चौपदरीकरणाचे काम अहमदनगर येथील ए.सी शेख कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून त्यांनाखोदकामाने पाणीपुरवठा खंडित होण्याच्या सूचना वारंवार देण्यात येऊन सुद्धा जलवाहिनी क्षतिग्रस्त करण्याचे काम सुरु आहे. याबाबत पाहणीदरम्यानआयुक्तांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात समज दिली आहे.

रस्त्याचे खोदकाम करतांना जलवाहिनीचे कुठलीही नुकसान होऊ नये याची काळजी घेत पालिकेशी समन्वय राखून काम करण्याच्या सूचनादेण्यात आल्या होत्या. त्यानंतरही महानगरपालिकेला कुठलीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी क्षतिग्रस्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिका यांची कामे समन्वयाने करण्याचा महानगरपालिकेद्वारे प्रयत्न होत असतांना सुद्धा राष्ट्रीय महामार्गप्राधिकरणतर्फे निष्काळजीपणाने खोदकाम करून जलवाहिनी पाणीपुरवठा विस्कळीत करण्यात येत आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून महानगरपालिकेचे सहायक आयुक्तविजय देवळीकर, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, संजय जोगी पूर्ण वेळ दुरुस्ती कामावर लक्ष ठेऊन आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.