Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे ११, २०१९

बुटीबोरी नगरपंचायतींसाठी 17 मे रोजी प्रारूप मतदार याद्या




मुंबई, दि. 10 (रानिआ): नव्याने स्थापित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायत आणि बुटीबोरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक; तसेच 22 विविध नगरपरिषदा व नगरपंचायतीतील 24 सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी आणि मानवत (जि. परभणी) नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले, या निवडणुकांकरिता 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 21 मे 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 27 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 29 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. सहारिया यांनी दिली.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायती: चंदगड (जि. कोल्हापूर) आणि बुटीबोरी (जि. नागपूर).

नगरपरिषदा/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या सदस्यपदांच्या रिक्त जागांचा तपशील: बारामती (जि. पुणे)- 5 ब, दुधनी (सोलापूर)- 2 अ, नांदगाव (नाशिक)- 7 ब, देवळा (नाशिक)- 11, श्रीरामपूर (अहमदनगर)- 9 ब, संगमनेर(अहमदनगर)- 10 अ, नेवासा (अहमदनगर)- 13, जामखेड (अहमदनगर)- 14, दोंडाईचा-वरवाडे (धुळे)- 8 अ, सोयगाव(औरंगाबाद)- 16, अंबाजोगाई (बीड)- 4 अ, सोनपेठ (परभणी)- 1 ब, मानवत (परभणी)- अध्यक्ष, हिंगोली (हिंगोली)- 11 ब,जळगाव-जामोद (बुलढाणा)- 8 अ, दारव्हा (यवतमाळ)- 2 अ, मोहाडी (भंडारा)- 4, मोहाडी (भंडारा)- 9, मोहाडी (भंडारा)- 12, लाखांदूर (भंडारा)- 16, देवरी (गोंदिया)- 11, कोपरना (चंद्रपूर)- 15, मूल (चंद्रपूर)- 6 अ, भामरागड (गडचिरोली)- 5 आणिभामरागड (गडचिरोली)- 16,

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.