विदर्भ राज्य आंदोलन समिति करणार ठिय्या आंदोलन - राम नेवले
३ जून २०१९ रोजी निघणार संविधान चौक, ते ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांचे निवासस्थान कोराडी येथे "विशाल वीज मार्च"
नागपूर :- दि. १२.०५.१९। विदर्भाचा कोलसा होणार विदर्भात कारखाने येत नाही. त्यामुळे खाजगी नोक-याही मिलत नाही. नेहमी सततची वीज दरवाढ विदर्भालाच सोसावी लागते. विदर्भात ६३०० मेगावँट वीज तयार होते. तरीही फक्त २२०० मेगावँट वीज दिली जाते. सर्व विजनिर्मिती प्रकल्प विदर्भात,वीज विदर्भात तयार होते. काही ठिकाणी ५२% पर्यंतचा चोरीचाही भार विदर्भातील जनतेलाच द्यावा लागतो.
विदर्भात ४१०० मेगावँट विज शिल्लक असताना सुद्धा विदर्भातच सरकार पुन्हा १३२ नवीन कोलसा आधारित वीज प्रकल्प आणून त्या द्वारे ८६४०७ मेगावँट वीज तयार करणार असून बाकीची ४१०० मेगावँट वीज मुंबई- पुण्याकडे जाते.तसेच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कंरीडोरकरिता वीज पाठविणार आहे. त्यासाठी अधिकचे वीज उत्पादन करणार आहे. तिरोड्याला अदानीचे, अमरावतीला इंडियाबुल तर मौदयाला एन.टी.पी.सी. चे विज प्रकल्प सुरू झाले आहे. कोराडीला पुन्हा १३२० मेगावँटचे दोन प्रकल्प सुरू होत आहे. चंद्रपूर मध्ये सर्वात जास्त उष्णतामान होऊन प्रचंड प्रदुषित शहर झाले. दमा,कँन्सर, हृदयरोग सारखे दुध्रर आजाराने चंद्रपूर शहर देशात नंबर एक वर आहे. कोराडी खापरखेडा येथिल विज प्रकल्पामुले नागपूर शहरासह ५० कि.मी. चे क्षेत्र कँन्सर, दमा सारख्या बिमारीचे माहेरघर बनत चालले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी माहिती दिली. या आंदोलनात संपूर्ण जिल्ह्यातील संघटना,शेतकरी संघटना, व्यापारी, या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सर्वाधिक वीज देशात महागडी!
देशातील सर्वाधिक जास्त उष्ण १० जिल्ह्यापैकी ७ जिल्हे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली (Hot spot) विदर्भातील आहे.महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात कर्जबाजारी राज्य झाले आहे विदर्भाची राख रांगोली होणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिति ही काही खालील मागण्या घेऊन उर्जा मंत्री यांच्या घरासमोर 'वीज मार्च ' पैदल खापरखेडा पर्यंत घेऊन जाणार.
१) विदर्भ राज्य आंदोलन समिति तर्फे विदर्भातील वीज दर निम्मे करा.
२) विदर्भ प्रदूषण मुक्त करा.
३) १३२ नवीन प्रस्तावित वीज प्रकल्प रद्द करा.
पत्रकार परिषदेला उपस्थित डॉ.श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, विष्णु आष्टीकर, मंगलमूर्ति सोनकुसरे, मुकेश मासूरकर, प्रफुल्ल शेंडे इ.